Friday 9 December 2011

ajab story

शामची आई ; दादाहरीचा आजोबा
भोपळ्याची चोरी आणि अनिताचा सर्व्हे !

आमच्या अनिता बाई गेले ५ दिवस ब्लोग वरून गायब आहेत; भोपळा तसा पचायला सुलभ असतो . पण आमच्या
अनिता बाईना तो चांगलाच बाधलेला दिसतोय.
काय आहे ; सानेगुरुजी सारख्या सरळ साध्या निरपेक्ष
माणसावर ते केवळ जातीने ब्राम्हण आहेत म्हणून वाटेल ते
आरोप करणे ; पुस्तकातले संदर्भ घेवून " शामची आई आदर्श कशी ?" असा बेमुरवत प्रश्न विचारणे आणि त्याचा आधार घेवून
या आत्मचरित्र वजा कादंबरीच्या हेतू आणि उद्देशावरच
प्रश्नचिन्ह निर्माणकरून समाजात जातीय मळभ निर्माण करणे
ही अनिताबाईची प्रवूत्ती मला घातक वाटली ;
मी काही ब्राम्हणाची बाजू घेवून किंवा दलितांचा द्वेषी म्हणून
हा "भोपळ्याचा लढा" लढलेलो नाही . मी स्वतः जातीने  मराठा
आहे , मराठा आणि बहुजनांचा उद्धार आणि प्रगती व्हावी
व त्या साठी मराठा बहुजनांच्या तरुण पिढीने श्रम अप्रतिष्ठेचा न्यूनगंड आणि जाती श्रेष्ठत्वाचा अहंगंड सोडून शिक्षण , उद्योग ,
व्यवसाय , कला , क्रीडा , साहित्य , आदी क्षेत्रात हिरारीने उतरले पाहिजे , ब्राम्हण आम्हाला अडसर ठरतात , असे म्हणून कसे चालेल ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ब्राम्हण नव्हते का ? त्यांनी तर आपल्या स्वराज्याच्या कामात ब्राम्हणांचे
सहकार्य देखील घेतले.  अनिता बाई जांच्यात धमक आणि क्षमता असते त्यांना त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टां पासून कोणीही रोखू शकत नाही ; ज्यांच्यात मुळात कुवत नसते
ते मात्र आपल्या अपयशाचे खापर फोडण्या साठी डोकी शोधत
फिरत असतात ; आपण उपस्थित केलेले  ....
१) शामची आई आदर्श कशी ?
२) ज्ञानपीठ पुरस्कार ब्राम्हनानच कसे ?
३) ब्राम्हणाचे गो- मांस भक्षण
४) शिवराज्यभिषाकातील ब्राम्हणाच्या जेवणावळी
    आणि दानधर्म
५ ) परशुरामाच्या भाकड कथा
६ ) मराठ्यांना धर्मांतराचा अनाहूत सल्ला
आणि आपण आपल्या ब्लोग आणि फेसबुक वरून केलेले
संदेशवहन हे सर्व पहिल्या वाचल्या नंतर कुणाही सुज्ञ माणसाला अस्वस्थ झाल्या शिवाय राहवणार नाही ;
मी तर केवळ अस्वस्थ नव्हे चिंतीत झालो . आपण चक्क
मराठा जिहाद उभा करण्याची बीजे पेरत होतात ; ही विषवल्ली
रुजू न देता मुळापासून उखडून फेकण्या साठी मी आपल्या विरुद्ध दंड थोपटले आहेत ; मुद्दा शामची आई ; माझे आजोबा ;
भोपळ्याची चोरी आणि आपण लावलेला सर्व्हे हा नाही
ते केवळ निमित्त आहे ;


Tuesday 6 December 2011

ek kavita vadyachi

वाडा चिरेबंदी

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

आब-रुबाब उरला नाही
घोडे-तांगे बारदाना गेला
कळा गेली ,रया आली
घोशा सुध्धा उघडा झाला

वाडा चिरेबंदी 
तसा आजूनही आहे उभा 

शेतं आताशा पिकत नाहीत 
बळदं -पेवं भरत नाहीत
फार कशाला वर्ष भर
दाण्याला दाणा लागत नाही

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

रोजगार हमीवर सारा गाव
रोजच कामासाठी जातो
शे-पन्नास रुपये रोज
हमखास कमावतो
वाड्यातील लोकांना मात्र
बुलंद दरवाजा आडवा येतो

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

पावसाळ्यात गावातील
घरांची पडझड झाली
सरकारकडून गावाला
नुकसान भरपाई मिळाली
वाडा मात्र पडला नाही
तेव्हा त्यांनी त्याला
लाखोली वाहिली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

नोकऱ्या मागायला गेले तेव्हा
"पाटीलकी" आडवी आली
टेबला खालून आले हात
तर खिसे होते खाली
आज दुश्मन झाली वाड्याला
वाड्याचीच सावली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

एक दिवस पेपरच्या
फ्रंट पेजवर बातमी आली
अमुक तमुक गावात
सामुहिक आत्महत्या
एक कुटुंब उधवस्त

वाडा चिरे बंदी
तसा आजूनही आहे उभा

आता तेथे सार्वजनिक
धान्याचे कोठार साठले आहे ......

Monday 5 December 2011

bas aata thambva

चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक

अनिता कळले का आपला समाज कसा आहे ते ?
सखोल अभ्यासपूर्ण चिंतनपर आणि प्रगल्भ  विचार मंथना पेक्षा
आमच्या भारतीय समाजाला " भोपळ्याच्या चोरी " वर
बाजार गप्पा करण्यात अधिक रस आहे.
माझ्या आजोबाचा भोपळा कसा " टुन्नुक टुन्नुक" चाललाय बघताय ना !
असो ; आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वान दिना निमित्त मी
माझ्या आजोबाच्या वतीने ( ते आता हयात नसल्या मुळे ) संपूर्ण दलित समाजाची
आणि या घटनेतील प्रत्यक्ष पिडीत दलित व्यक्तीची जाहीर माफी मागून दिलगिरी
व्यक्त करतो.
तशीही माझ्या आजोबाना आणि त्यांच्या आम्हा सर्व वारसांना नियतीने
आणि  स्वतंत्र भारताच्या घटनेने दिलेल्या अधिकारात श्रीमती इंदिराजी गांधी यांनी
केलेल्या कमाल जमीन धारणा कायद्याने या घटनेची जबर शिक्षा या पूर्वीच दिलेली आहे ,
माझ्या आजोबांच्या १७८  एकर जमिनी पेकी १९  एकर जमीन सिलिंग ( कमाल जमीन धारणा )कायद्याने गावातील दलितांमध्ये वाटली गेली होती त्यात चाबकाने फोडलेल्या दलिताला ३ एकर जमीन मिळाली होती ' ( आज या जमिनीची किंमत ९ लाख रुपये एकर आहे ' म्हणजेच आजघडीला तो भोपळा आम्हाला २७ लाखाला पडला आहे )
तरीही अनिता मी त्या दलिताची आणि तुमच्यासह तमाम दलित सामाजीची
भोपळा चोरी च्या घटने बद्दल माझ्या आजोबाच्या वतीने जाहीर माफी मागून खेद आणि
दिलगिरी व्यक्त करतो ; फक्त एक कृपा करा मला या घटनेचा जाहीर निषेध मात्र करायला
सांगू नका ; नातू म्हणून माझ्या आजोबांचा तेवढा तरी सन्मान राखा हि त्यांचा नातू म्हणून माझी आपणास नम्र विनंती . आता हे भोपळा प्रकरण कृपया थांबवा

yala mazi harkat nahi

याला माझी हरकत नाही

प्रिय अनिता,
तू वेद ,वेदांगे ,उपनिषदे ,पुराणे, रामायण - महाभारत या सारखी महाकाव्ये
यात येणाऱ्या कथानकांचा तात्कालिक समाजव्यवस्थेचे प्रतिक म्हणून आभ्यास
करतेस की एतेहासिक सत्य म्हणून ? की केवळ कवी कल्पना म्हणून ?
हे आधी एकदा नीटपने विचारपूर्वक ठरव.
हे हि लक्षात ठेव की हे साहित्य अपोरषीय म्हणजेच कुणा एकाने लिहिलेले नसून
मोखिक म्हणजेच एकापीढी कडून दुसऱ्या पिढीकडे कथा , गोष्टी , गाणी , लोकगीते , 
लोककला , प्रवचने , स्त्रीगीते , कीर्तने , जानपदगीते , जात्यावरच्या  ओव्या , या सारख्या अनेक
माध्यामातून प्रवाहित झालेले आहे . प्रवाहित होताना त्यात स्थळ काळ व्यक्ती समाज
अशा अनेक संधर्भांची भर पडत गेलेली आहे . त्या साठी कुणा एका व्यक्ती वा समाजाला
दोष देता येणार नाही , कृष्ण या पत्र बद्दल तर बोलायलाच नको ; त्याच्यावर तर
तमासगीरानी सुध्धा हात फिरवला आहे ,
पण एकंदर तू हा विषय निवडलाच आहे तर तू या सर्व साहित्यावर चिकित्सा जरूर
कर . हरकत नाही , फक्त एकच पथ्य सांभाळ ; नेहमी प्रमाणे हरदासाची कथा मुळ पदावर
या न्यायाने पुन्हा कुणा एका जातीवर शरसंधान करण्या साठी आपला वेळ आणि बुद्धी
खर्ची घालू नकोस , तू पुन्हा त्या दिशेने जात आहेस हे ज्या क्षणी जाणवेल त्या क्षणी
हा दादाहरी तुला रोखण्या साठी तुझ्या समोर उभा ठाकलेला असेल .
तो पर्यंत तूर्तास सप्रेम नमस्कार , वडिलकीच्या नात्याने अधिकार वाणीने दोन शब्द
सुनावले ; त्या बद्दल वाईट वाटून घेवू नकोस , लेकराला मुस्कटात मारताना वळ लेकराच्या  
गालावर आणि पीळ बापाच्या पोटात पडत असतो हे लक्षात घे . जमल्यास सरोजा
नावाच्या एका आपल्याच मराठा मुलीने पाठवलेली प्रतिक्रिया मनापासून समजून उमजून
वाच ....मी सुध्धा ती प्रतिक्रिया वाचून तुझ्या बाबतीत वेगळा विचार करण्यास उदुक्त
झालो ,,,,पण याचा अर्थ असाही नाही की तू काहीही करावे आणि मी खपवून घ्यावे ,,,
याचेही भान असू द्यावे ....धन्यवाद !

Saturday 3 December 2011

mi ghabarat nahi

होऊन जाऊदे पर्दाफाश !

पांडवांचा अज्ञातवासाचा आधार घेवून स्वतःच्या वाटमारीला थेट धर्मयुद्धाचा
मुलामा चढवू पाहणाऱ्या बृहन्नडे हा अज्ञातवास सोडून तू प्रथम स्वतः हून जाहीरपणे
तुझी खरी ओळख सर्वाना सांग. हे असे नथीतून तीर मारलेस तर तुला मी याच भाषेत बोलणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगतो .
आणि माझी तहकिकात वेगेरे  करण्याची किंवा माझ्या कोणा विरोधकांनी किंवा
माझ्या विद्यार्थ्यांनी तुला माझ्या काय कहाण्या व गुजगोष्टी सांगितल्या आहेत
त्याची जाहीर चिरफाड करणार अशा धमक्या दिल्यास म्हणजे मी तुला मराठा -
बहुजनाच्या तरुण पिढीचा बुद्धीभेद  करण्यासाठी रान मोकळे सोडील या भ्रमात आजीबात
राहू नकोस . " मोडेल पण वाकणार नाही , मारेल किंवा मारेल पण हटणार नाही "
हा मरगठ्ठा बाणा माझ्या रक्तात आहे ; तुझ्या पोकळ धमक्यांना मी आजीबात भीक
घालणार नाही .
तू कोण आहेस हे मी आणि मीच सर्वाना सांगू शकतो ; मी तुला केव्हाच ओळखले आहे .
पण तू ते स्वतःच जाहीर करावेस ही माझी तुला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे .
आणि एकदा ब्लोग किंवा फेसबुक सारख्या सार्वजनिक विश्वात उडी घेतल्या नंतर 
पुन्हा माझ्याशी खाजगीत  संपर्क करून माझी गुपिते उघड करण्याची धमकी देवून
माझे लेखन अनुकूल गटात करून घेण्याचा प्रयत्न करणे याला ब्ल्याक्मेलिंग म्हणतात .
स्वतःला भारतीय समाजाची सखोल आणि संदर्भीय अभ्यासक म्हणवणाऱ्या भल्या
माणसा स्वतःचे विचार मांडताना तुला स्वतःची ओळख लपविण्याची गरज भासते हाच 
तुझा पराभव आहे ,,,,,,,,हिम्मत असेल तर आधी अंगावर घेतलेली घोंगडी काढ
आणि मग हे विचार मंथनाचे आग्या मोहळ उठव......पण मला माहित आहे
ती हिम्मत तुझ्यात नाही " तू तरवडाला मोहळ शोधून बीड्याच्या धुरात
माशा आंधळ्या करून मोकाल्लेल्या पोळ्या गोळा करणाऱ्या परंपरेतली ( ला )
आहेस ,,,,,,,तुला मी घाबरेण आणि तुझे हे कांद्याने कांदा सडवण्याचे उद्योग
खपवून घेयील असा  चुकून ही समज करून घेऊ नकोस ; 
होऊन जाऊदे पर्दाफाश .....मी तयार आहे ......पण एक लक्षात ठेव एकदा तलवारी 
उपसल्याकी त्यांना खून चढवल्या शिवाय म्यान करता येत नाही .....चालविल्या कि दोन्ही कडचे
रक्त सांडल्या शिवाय गत्यंतर नसते ......होऊन जाऊदे .....निदान या निमित्ताने तू कोण हे तरी जगाला
कळेल .... आणि तुझे हे जे काही वेचारिकतेच्या नावावर थोतांड चालले आहे त्याचाही जाहीर
न्याय निवडा होयील .....काला सच काय आणि सफेद झूट काय हे लोकांना ठरवू दे  तेंव्हा आता खाजगीत बोलूच नकोस ...मराठा किंवा बहुजन म्हणून
माझ्या बद्दल सोम्यताही बाळगू नकोस ...माझ्या कडूनही तशी अपेक्षा करू नकोस.

Friday 2 December 2011

darudyache pravachan

दारुड्याचे प्रवचन......

अनिता...एखादा दारुडा रोज गल्ली गाजवतो आणि जागवतो सुद्धा
त्याची जी काही बडबड असते त्यातही कधी तत्वज्ञान ,कधी प्रवचन ,
कधी शिवीगाळ असते. त्याचा हा रोजचा गाढव गोंधळ ऐकायला आणि पाहायला
लोक गम्मत म्हणून जमत असतात .त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन नव्हे .
पण त्या दारुड्याला मात्र ते सर्व आपले समर्थक आहेत असे वाटत असते .
काही लोक तर अश्या दारुड्याला मुद्दाम प्रोस्ताहन देवून गम्मत घेत असतात .
त्यात अधिक रंगत यावी म्हणून त्याला दारू सुद्धा पाजतात .
त्याच्या या मूर्ख बेबंद अध:पाताचा खरा त्रास मात्र त्याच्या बायका मुलांना
आई बापाला आणि खऱ्या मित्रांना भोगावा लागतो .
तुला २०,००० हजार वाचक संख्या मिळाली यातले कोण आणि किती
वाचक हॉशे गवसे नवसे प्रकारात मोडतात याची तुला कल्पना आहे काय ?
माश्या काय गुळावर बसतात आणि गुवावरही बसतात , पण तुला मिळणाऱ्या या
पेशींची अनियंत्रित वाढीला कॅन्सर म्हणतात तू त्याला शरीरसोष्ठव मानायला
लागलीस आणि हुरूळून जाऊन आणखी बेबंद पणे लिहु लागलीस तर त्याचा 
त्रास तमाम मराठा आणि बहुजन समाजाला भोगावा लागेल . हा मराठा जिहाद बंद कर
आणि एक मोलाचा सल्ला देतो हे बृहन्नडेचे सोंग सोड , हिम्मत असेल तर तू तुझ्या मुळ
स्वरुपात समोर ये .
   आणखी एक;  माझ्या आजोबांनी  ( मी लहान असताना ) शेतातला भोपळा खाण्यासाठी चोरला
म्हणून एका दलिताला चाबकाने मारले होते ही खरी घटना सांगताना मला लाज वाटण्याचे
काय कारण ? किंवा त्या मुळे माझे आजोबा पापी ठरतात असेही मला वाटत नाही ;
आज भोपळा चोरला म्हणून माफ केले आणि दुसरया दिवशी हिम्मत वाढून त्या दलितांनी  आख्खे
शेत लुटून नेले असते तर माझ्या  आजोबांनी काय करायचे होते ?
आणि त्या त्या काळाची एक रीत परंपरा असते ? हे तू कधी समजून घेणार ?
तुला माहित आहे का ? रायगडाच्या बांधकामाच्या वेळी दिंडी दरवाज्याचे बुरुज बांधताना
त्या बुरुजात ( दोनी कडच्या ) एक जेठा - जेठी ( म्हणजे घरात थोरले असणारे ) मातंग जातीचे
तरुण दाम्पत्य जिवंत पुरण्यात आले होते . त्या काळात असे बळी देण्याची प्रथा ( आता त्याला अघोरी प्रथा म्हणतात ) होती ; आता या घटनेला जबाबदार धरून तू शामची आई आणि माझ्या आजोबा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊ मांसाहेबाना सुद्धा पापी ठरवणार का ? आणि निश्चल पुरीने केलेला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक( ? )  तर सरळ सरळ एका भगताने
अघोरी विद्येच्या आधारे केलेला जादूटोणा होता , त्यात तर कशा कशाचे आणि कश्या पद्धतीने
बळी आणि अघोर कर्म केले गेले ते जाहीर पणे सांगणे ही अनर्थकारी ठरेल
असो अनिता या गोष्टी चा मतितार्थ तुला कळणार नाही ; सांगून काय उपयोग .

Wednesday 23 November 2011

tu mhantes te thik aahe pan ......

सुनिता तू म्हणतेस ते ठीक
आहे पण ...........................
सुनिता , ठाकरे मंडळी ( बाळा साहेब , उद्धव , राज , लिंबू टिंबू - आदित्य  इत्यादी वेगेरे )  
आणि त्यांच्या राजकीय भूमिका / ध्येय / धोरणे या त्यांच्या पक्षाच्या ( शिवसेना / म न से ) अंतर्गत मामला आहे . पण ठीक आहे या निमित्ताने तू थोडीशी ताळ्यावर येऊन
जमिनीवर उभी राहून आणि आजच्या काळाशी संबधित व सुसंगत लिहायला लागलीस .
हे हि नसे थोडके. सुनिता , महाराष्ट्रातल्या मराठा बहुजनच काय कोणत्याच तरुणांनी ठाकरे आणि कंपनीच्या कोणत्याच तंबूत ( कंपूत ) जाऊ नये या मताचा मी आहे . फक्त ठाकरेच
कशाला शरदरावांचा राष्ट्रवादी , सोनिया बाईंचा कोन्ग्रेस , आठवले आणि इतर दलित संघटनाचे छोटे मोठे तुकडे , बसपा / भा जा पा सारखे उपरे .....इतकेच काय अगदी मदाऱ्याचे
अस्वल ( अण्णा हजारे ) या पेकी कुणाच्याही नादाला मराठा व बहुजनांच्या नव तरुण पिढीने लागू नये .
आणि गेरसमज करून घेऊ नकोस ( छावा/ संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्मवाले / मराठा महासंघ यांच्या तर सावलीलाही उभे राहू नये )
मला सांग सुनिता या पेकी कोण धुतला तांदूळ आहे ? शिवसेनेच्या नावाने बोटे मोडून काय उपयोग ? त्यांना एवढे सगळे करून जेमतेम ५ वर्ष सत्ता मिळाली . उरलेली ४८ वर्षे या महाराष्ट्रात
बहुजनांचीच सत्ता होती ना ! तीन वर्ष मनोहर जोशी ( ब्राम्हण )  आणि २ वर्ष ७ महिने अंतुले ( मुस्लीम ) सोडले तर बाकी ४८ वर्ष मंत्रालयातल्या ६ मजल्या वरील मुख्यामंत्र्याच्या खुर्चीत
टेकलेली बुडे बहुधा मराठ्यांची आणि अपवादाने उर्वरित बहुजनांचीच होती आणि आहेत .
मंत्री मंडळातही कायम पाटील -देशमुखांचाच बोलबाला राहिलेला आहे . म्हणजेच ठाकरेंनी कितीही
पटकली आणि भा ज पा ने त्यात कितीही हवा भरली तरी महाराष्ट्रातील मराठा - बहुजन समाज
त्यांना फारशी भिक घालत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. ते इंदूर हून आले कि आणखी कुठून याचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषाकाच्या वेळी त्यांचा मूळ कुळपुरुष " शिसोदिया " होता आणि तो क्षत्रिय राजपूत होता असा वंशावळीचा पुरावा काढला होता . मग
शिवाजी राजांना सुद्धा तू परप्रांतीय म्हणणार का ग सुनिता ?
 बेताल लिहून आमच्या कडून स्त्रीदक्षिण्या ची अपेक्षा करताना हे लक्षात ठेव सुनिता कि तू स्त्री नाहीस ; बृहनडे चे रूप घेतलेला कुणी तरी बाप्याच आहेस हे आम्ही केव्हाच ओळखले आहे .
पण असो हा काही आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा नाही .
महाराष्ट्रातल्या मराठा बहुजन तरुणांनी शिवसेना / म न से / भा ज पा च्या नादी लागू नये हा तुझा मुद्दा १०० टक्के मान्य पण याच बरोबर या तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे व करिअर कडे लक्ष द्यावे
कोणत्याच राजकीय पक्ष संघटनांच्या नादी लागू नये असे सांगितले असतेस तर ते अधिक निरपेक्ष
सत्य वाटले असते . याचा अर्थ असाही नाही कि सगळ्यांनीच तिकडे पाठ फिरवावी . ज्यांचात क्षमता आहे त्यांनी खुशाल राजकारण करावे . पण कायम सतरंज्या उचलाव्या लागत असतील / दगड गोटे हातात दिले जात असतील / आणि त्या बद्दल श्रमपरिहार म्हणून दारू पाजवली जात असेल तर
या स्थितितील तरुणांनी त्वरित त्या पासून दूर व्हावे हे उत्तम .
आणि तू घाबरू नकोस सुनिता ठाकरे इतके हि अक्कल बाज नाहीत कि महाराष्ट्राला बुद्धू बनाऊ शकतील तुझ्या माहिती साठी सांगतो १९९५ ला शिवसेना भा ज पा ची जी सत्ता आली ती आमच्या
मराठा भूषण, क्रिकेट वाचस्पती, कृषीवल हृदय सम्राट , बारामती पुत्र  माननीय नामदार शरदचंद्रजी  गोविंद रावजी पवार यांच्याच महाकृपेने ! आणि आताही हाच मराठा गडी   पुन्हा त्यांच्या गोटात शिरून अंडी घालण्याच्या तयारीत आहे . तेव्हा सावधान धोका पुढूनच आहे असे नाही. तो आतून बाहेरून भोवताली
असा चोहीकडून आहे . मराठा बहुजनाच्या लेकरांना सावध करायची खरेच मनापासून तळमळ असेल तर
कुणा बद्दल वयक्तिक व जाती आधारित आकस न ठेवता त्यांना योग्य काय अयोग्य काय ते सांग .
सुनिता तू एखाद्या गोष्टीचा आभ्यास चांगला करतेस , वाद - प्रतिवाद हि प्रभावीपणे करू शकतेस
या तुझ्या कोशल्याचा विधायक दिशेने विकास व्हावा आणि त्याचा मराठा बहुजनाच्या तरुण पिढीला
फायदा व्हावा हि अपेक्षा . पुन्हा एकदा पुराण इतिहास सोडून वर्तमानात आल्या बद्दल अभिनंदन


Tuesday 22 November 2011

anarthach lavaycha tar

(अन)र्थच  लावायचा झाला तर 
.
अनिता  तुझ्या नावातच ' अ ' नीता असल्या मुळे तुझ्या कडून कुठल्या नीतिमान , विधायक आणि
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या विचार मंथनाची अपेक्षा करणार ?. खरेतर तुझ्याशी वाद - संवाद
करण्यातही काही अर्थ ( हशील ) नाही . शिंदे पाटील काय किंवा मी काय उगाच तुझ्या कडून
विधायक विचार प्रबोधनाची अपेक्षा करतो आहोत .
अनिता ज्या प्रमाणे भीष्म पितामह दुर्योधनाला तो आचार विचाराने सुधारावा म्हणून सुयोधन अशी हाक मारीत असत त्या प्रमाणे मी सुध्धा तुला आज पासून अनिता एवजी सुनिता म्हणणार आहे. ( पाहू निदान आता तरी महाभारत टाळताय का ) असो तर सुनिता प्राचीन  वेद-वेदांगे - पुराण - मध्ययुगीन इतिहास - संत- पंत साहित्य किंवा अर्वाचीन -आधुनिक साहित्य किवा प्रथा परंपरा हे त्या त्या काळाशी सुसंगत जीवन प्रणाली . समाजजीवन , समाजव्यवस्थे नुसार तयार होत असतात .
त्या सर्वच संदर्भांचा आजच्या काळाशी सापेक्ष संबध जोडून संबधित लोकांना आरोपीच्या पिंजर्यात
उभे करणे हा अन्याय आहे .
सुनिता तुला माहित नसेल पण ऐक ( मी याचे पुरावे देवू शकतो ) छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा मुख्य दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही बुरूजा
मध्ये ऐक तरुण जेठे मातंग ( मांग) दाम्पत्य जिवंत पुरले होते .त्या काळी अशी परंपरा होती .  ( आता हा सल्ला त्यांना ब्राम्हण कारभार्यांनी दिला असा कांगावा करू नकोस, नशीब समाज कि ब्राम्हण इतिहास कारांनी हि घटना पुस्तकात आणली नाही ( बखरीत आहे ) आता या वरून शिवाजी महाराजांना अंधश्रध किंवा दलित विरोधी समजत येयील का ?
आणखी ऐक संधर्भ पहा संत तुकारामांचा ऐक अभंग आहे
" राजियाचा पुत्र अपराधी देखा | तो काय आणिका दंडवेल |
    दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी ||
आता हा असा अभंग तुकोबांनी का लिहिला असावा ?
अनर्थच लावायचा तर पहा 
१ ) अफजल खानच्या आक्रमणाच्या वेळी खंडोजी खोपडा ( गाव वाचवण्या साठी ) खानाला भेटला ( त्या आधी त्याने महाराजांशी हि संपर्ग साधला होता परंतु महाराजांनी
त्यावेळी" आपले संतुक आपण पाहणे , आमचे कडे आस्तुकी लाऊ नये " असा उलट सांगावा पाठवला .या स्थितीत 
खोपड्या ने खानची भेट घेवून त्याला स्वतः च्या खर्चाने नजराणा आणि रसद देवून आपला गाव वाचवला होता ( तो खानाला सामील झाला नव्हता ) .प्रताप गडावर खान मारला गेल्या नंतर
खोपडा महाराजांना भेटायला गेला . त्या वेळी अचानक शिवाजी महाराजांनी खोपड्याचे हात पाय तोडून चौरंगा करण्याची शिक्षा दिली . शिस्त आणि फंद फितुरीला जरब व पायबंद बसावा
म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या या शिक्षेचे समर्थन करता येयील ( आपण करू )
२ ) रांझ्याच्या पाटलाला देखील आया बहिणीची बाटवणूक केली म्हणून तोफेच्या तोंडी दिले
      गेले ( हि जरब तर पाहिजेच होती )
३) प्रत्येक समयी पावलेला आणि एकदाच ( आई वरल्या मुळे सुतकात गाव सोडू न   शकल्या  मुळे समयासी न पावलेला)  नेताजी पालकर
४ ) सात साथीदार घेऊन मरणाची राड खेळलेला प्रतापराव गुजर
५ ) प्रताप गडाच्या युद्धात पराक्रम केलेला आणि शाहिस्तेखाना वरील कारवाईत शिवाजी महाराजांकडून ठरवून मारला गेलेला संभाजी कावजी
.....................सुनिता वरील सर्व प्रवाद शिवाजी राजेंचे पुत्र युवराज संभाजी कडून थोड्या फार फरकाने झाले होते ( किंवा तशी आवई उठली होती ) परंतु संभाजी राजांना त्या बद्दल कोणतीही शिक्षा झाली नाही .हाच संदर्भ घेवून तुकारामांनी वरील अभंग लिहिला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?
याच संदर्भात तुकोबांचे तोंड बंद करण्या साठी शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?


mazi bahin ashi asu sakat nahi

माझे  बहिणाबाई
अगं माझे बहिणाबाई तू स्वतःला तमाम मराठा समाजाची बहिणाबाई म्हणवतेस
आणि त्यांना ओवाळणी म्हणून जातीय विद्वेषाच्या सुपाऱ्या देतेस ?
अनिता माझी बहिण तुझ्या सारखी असू शकत नाही .
आणखी पुन्हा पुन्हा नम्रपणे विनंती पूर्वक मी तुला सांगतो कृपया मराठा तरुणाईला
बहकावण्याचा तुझा हा उद्योग बंद कर . दुधाचा म्हणून विषाचा पेला या नव तरुण मराठा
पिढीच्या ओठी लाऊ नकोस .
मी स्वतः मराठा आहे . ( आता कृपया त्या शिंदे सारखी माझी टर उडउ नकोस )
पण त्यात विशेष काय आहे ? एका आंबेडकरांच्या मुळे जसे सर्व दलित भारतरत्न ठरत नाहीत तसेच शिवाजी मुळे आम्ही सर्व मराठे छत्रपती ठरत नाहीत. तसेही शिवाजी महाराजांचे राज्य ठाणे .तळकोकण , पुणे . सिन्नर -जुन्नर , पंन्हाळा- कोल्हापूर अशा बारा मावळा  पर्यंतच होते . उर्वरित महाराष्ट्राला त्यांचा इतिहास आणि कार्य थेट स्वातंत्र्य नंतरच माहिती झाले . आपल्या मराठवाड्यात तर मराठे एकतर निजामाचे सरदार होते किंवा मग
गावात कुन्बिकी करीत होते . निजामाच्या अत्याचाराच्या गावागावातील कथा आजूनही जुने लोक सांगतात त्या ऐकल्यास तर तुझा मराठा असण्याचा आभिमान ( गर्व ) गळून पडेल .
असो सांगण्याचा मुद्दा असा कि हे सर्व उगाळण्यात आता काही अर्थ आहे का ?
भारतातील सर्व आक्रमणाना तू ब्राम्हणांना जबाबदार धरणार का ?
मुसलमान , पोर्तुगीज , इंग्रज हे सर्व ब्राम्हण मुळे इथे आले ? आणि त्यांच्या मुळे आम्ही ९०० वर्ष गुलामीत आमचे अस्तित्व हरवून बसलो ? स्वतः च्या स्वार्था साठी एकमेकाच्या
उरावर बसणारी आमच्या रक्तात भिनलेली भाऊबंदकी, जमिनीच्या तुकड्या साठी ,इनामासाठी ,सरदारकी , जहागिरी साठी हपापलेली आमची बेदील बेबंद मराठ्यांची डोक्यालिटी आजूनही आमच्या गुण सूत्रात अनुवंशिकतेने कायम आहे . तू स्वतःच्या गावात ( घरातही ) हे पहिले असशील . आम्ही मराठे १० / १० फुटाचे बांध पडीक पाडू पण भावाचे पट भर वावर हडपण्यात आम्हाला जीवन धन्य झाल्या सारखे वाटते . गावातल्या मारवाड्याला , तालुक्याच्या आमदाराला झेडपी मेंबर ला त्याच्या पोर पोरीच्या लग्नात  आम्ही मोठ मोठ्या भेटी देतो पण गरीब भावाच्या लेकीच्या लग्नात मदती एवजी विघ्न आणण्याचा बेरकी पणा दाखवतो
गढीची जागा मारवाड्याला विकून गढीच्या माती साठी एकमेकाचे मुडदे पाडणारे पाडणारे
मराठे तुला पाहायचेत ? मी दाखवतो . कधी येतेस माझ्या बरोबर बोल ? शेतं पडीक पडून
बायको ( पाटलीन बाई ) गावात रोजंदारीने जाते . पोरगा गावात टुकार सारखा कपाळाला टिळे लाऊन फिरतो . आणि पाटील कडक टोपी घालून बगलेत पुण्य नगरी ची पीळकांडी
ठेऊन तालुक्याला ( बिनकामाचा ) भटकतो ( संध्या काळी कुणाकडून तरी देशी मिळवण्या साठी ) हे चित्र पाहायला येतेस माझ्या बरोबर ? हे मराठे सुधार अनिता ...हे मराठे सुधार ....ब्राम्हणांना दोष देऊन काहीही बदलणार नाही
आमचा र्हास नेमका कुणा मुळे झाला ? अनिता साप निघून गेला आहे तू साप म्हणून
भुई धोपटत आहेस . त्याचा काही उपयोग नाही .


va rekha tai

व्वा रेखा ताई !
तुझे नाव छम्मक छल्लो आहे ते कदाचित ब्लोग साठी घेतलेले टोपण नाव असेल
मी पण ब्लोग वर दादा हरी या टोपण नावाने लिहितो .
खरे सांगुका रेखा , तू जी काही प्रतिक्रिया लिहिली आहेस ती अफलातून आहे .
तुझ्या उपहास शेलीला मनापासून दाद आणि सलाम .
काय सांगू या आनिताने गेले काही महिने ब्लोग आणि फेसबुक वरून जो मराठा जिहाद
चा उछाद मांडला आहे त्यामुळे फेसबुक आणि ब्लोग वर भेट देणाऱ्या मराठा आणि ब्राम्हण मुलां मध्ये कमालीचा विद्वेष निर्माण होऊ लागला होता . माझ्या काही विद्यार्थ्यांनी ( विद्यार्थिनी सुध्धा ) मला हा मराठा दहशतवाद लक्षात आणून दिला . अनिता नावाची कुणीतरी जातीय अहंगंडाने पछाडलेली एक बाई ( ?) विचारवंतांचा / आभ्यासुपनाचा/ चिंतन
आणि प्रबोधनाचा आभास निर्माण करून इतिहास आणि पुराणाचे सोयीचे संदर्भ आणि अर्थ -अन्वयार्थ काढून नव्या पिढीची दिशाभूल करीत आहे . पण कुणीच या बद्दल तिला काही बोलण्याची हिम्मत करीत नव्हते . ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना या अनिताने जाहीर अपमानित केले . असे असताना मी तिच्या या लिखाण बद्दल लिहिले .
तुला त्यातील मर्म उमजले आणि तू अतिशय मार्मिक पणे त्यावर टिप्पणी केली
त्या बद्दल धन्य वाद

Tuesday 15 November 2011

anita ( ? ) patil yansi

प्रिय  अनिता

मला तुझ्या लेखन आणि प्रबोधना बद्दल आजीबात आक्षेप नाही
मला तू ओळखतेस / ओळखतोस ही आणखी चांगली गोष्ट झाली.
तू तुझी ओळख लपवून का लिहितेस / लिहितोस ?
ज्यांना खरोखर समाज प्रबोधन करायचे असते त्यांनी समाजाचा रोष सहन करण्याची देखील मानसिक /शारीरिक तयारी ठेवावी लागते . तुकारामाला आदर्श मानताना फक्त त्यांचा परखडपणाच नाही तर खुले पणाही आपण आदर्श म्हणून स्वीकारला पाहिजे. तुकारामांनी
अनंत संकटे ( अगदी मृत्यू देखील ) स्वीकारून आपले समाज प्रबोधनाचे कार्य केले . पण कधीही ओळख लपविली नाही .
आपण लिहित चांगले आहात . त्यात आभ्यास आणि चिंतन ही आहे . पण आपण जे लिहितोय ते या सायबर युगात समाजाला पुढे नेणारे / काही दिशा देणारे आहे की
जुन्या जखमांना चिघळून दुहीची बीजे पेरणारे आहे ? हे तुम्हीच पहा .
इतिहासाचा आभिमान जरूर असावा . त्यातून प्रेरणा ही घ्यावी . पण समाजात तेढ निर्माण होईल असे संदर्भ उकरून काढणे हे विचारवंतांचे / समाज प्रबोधकांचे काम नव्हे .
हं......जर आपण छावा / संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्म या सारख्या संघटनाशी
संबधित असाल तर आपले हे वेचारिक अभियान आपणास लखलाभ . मग आपणास काही  सांगण्यास काही अर्थ नाही .
                                                                                 धन्यवाद ! 

                                                                          आपला
                                                                          रवींद्र तहकिक

Tuesday 8 November 2011

tukoba aani shivba

तुकोबा आणि शिवबा


मला संत तुकाराम महाराजां बद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल नितांत आदर आहे. आपले भाग्य म्हणून तुकाबांच्या रुपात एक देवमाणूस आणि शिवबांच्या रुपात देवदुर्लभ महापुरुष महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुळेच महाराष्ट्राच्या मातीत सुजन्य आणि वीरता रुजली. ( त्यांनी रुजवलेल्या या बीजामुळेच तेंव्हा आणि आजही आपण बामणी कावा/ काही मराठ्यांची फंद- फितुरी आणि मोगली-इग्रजी - काँग्रेसी - शिवशाही ( बाळशाही ) , शारद्शाही इत्यादी आक्रमणातही टिकून आहोत )

पण मला इथे एका वेगळ्याच मुद्दया कडे आपले लक्ष वेधायचे आहे
तुकोबा आणि शिवबा एकाच कालखंडातील आहेत हे आपणास माहितीच आहे .
काहींच्या मते शिवबा तुकोबांना भेटले देखील होते . शिवबांनी तुकोबांना नजराणा पाठवला होता अशीही एक दंत कथा इतिहास म्हणून सांगितली जाते .
असे जर असेल तर मग
१) ज्यावेळी देहूतील ब्राम्हणांनी तुकोबांना त्यांची गाथा डोहात बुडवायला सांगितली
   त्यावेळी त्या परिसराचे सरदार ( जवळपास राजेच ) असणाऱ्या शिवबांनी ही घटना का   
होऊ दिली ( गाथा बुडवण्याची घटना अचानक नाही तर धर्म  पीठ बोलावून, तुक्या वेदिक धर्म विरोधी विचार मांडीत असल्याचे आरोप ठेवून , तुकारामांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याचे नाटक वठवून  समारंभ पूर्वक करण्यात आली होती . गाथेचे बाड खुद्द तुकाराम महाराजांच्या डोक्यावर देवून मागे त्यांचे सर्व टाळकरी / वारकरी चालवत नेवून संत विचाराची धिंड आणि नंतर खून ( पाण्यात बुडवून ) करण्यात आला . ही सर्व प्रक्रिया चार दिवस चालली . तरीही तेथून चार कोसावर असणाऱ्या शिवबांनी हे का रोखले नाही ?

bare mag ?

अनिता बाई समजा तुमच्या तर्क आणि आभ्यास नुसार ब्राम्हण गोमांस भक्षण करीत होते
तर आज ४/५ हजार वर्ष नंतर ते सिद्ध  करून तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?
शेतीचा शोध लागण्या पूर्वी फळे कंदमुळे आणि शिकार करून त्या प्राणी किवा पक्षांचे मांस खाणे या शिवाय दुसरा पर्याय काय होता ? त्यातली त्यात गाय सोपी ( स्वभावाने गरीब, सहज उपलब्ध , आणि भरपूर मांस असणारी ) म्हणून तिचे मांस जास्त प्रमाणात खाल्ले जात असेल. ब्राम्हणांना सहसा भाकड गायी ( अव्त्सासंभावा ) दान म्हणून दिल्या जात असत . या गायींना ब्राम्हणांनी ( शेती नसलेल्या ) पाळायला हवे होते असे आपणास म्हणायचे आहे का ? ( आणि त्यांना खायला काय धोतरे फेडून द्यायची होती ?)

Wednesday 26 October 2011

nar 36 nakhare vali

अनिता बाई बद्दल काय बोलावे ?

ही नार  धारदार 
करी तलवारीचे वार
ब्राम्हणांचे फेडी पार 
धोतर SSSSSSSSSS 

देई शेंडीला झटका 
 देई ढेरीला फटका 
जानव्याला देई खोल 
चटका SSSSSSSSSSS 

घेई मराठ्यांचा केवार
बसे ब्राम्हणांच्या उरावर 
काहीकेल्या तिथूनिया
उठेना SSSSSSSSSSS

 

Thursday 20 October 2011

ya patilinbaila aavra

या पाटलीणबाईला आवरा

अरे कुणी तरी या बोलभांड अनिता पाटलीण बाईला आवरा,...............
इतिहासातून नकोते संदर्भ उचलून त्यातून हवेतसे अर्थ काढून ही कजाग बाई काय सिद्ध आणि त्यातून काय साध्य करू इच्छितेय हेच मला कळत नाही . साने गुरुजीना जातीयवादी म्हणताना
या बयेने अक्कल गहाण ठेवली होती की नशापाणी करून पोटातली गरळ बाहेर ओकत होती ?
शिवाजी महाराजांच्या राज्याभीषेकाचा संदर्भ देताना ही बया तिथे ब्राम्हणांनी काय आणि किती खाल्ले याचा आणि कुणी किती दान घेतले याचा हिशेब लावत बसली आहे. अग बये राज्याभिषेका सारखा मोठा सोहळा म्हटल्यावर दानधर्म अन्नदान इत्यादी आलेच, त्या काळातील त्या काही परंपरा होत्या
त्याच्या खर्चाचा हिशोब मांडताना तू ' स्वराज्य उभे करण्या साठी झाला नाही एवढा खर्च अन्नदान आणि दक्षिणेत दानधर्मात झाला " असे म्हटलेस यात ब्राम्हणाच्या बुभुक्षित भिक्षुकी वृतीचा निर्देश करताना तूशिवाजीमहाराजांनादेखील भोगविलासी राजांच्या पंक्तीला नेवून बसवलेस
 हे तुझ्या ब्राम्हण द्वेषाने भडकलेल्या मेंदूत आलेही नसेल . जो काही दानधर्म झाला तो स्वतः छत्रपतींच्या मर्जीने व उपस्थितीत स्वहस्ते झाला . तू म्हणतेस तशी  त्यावेळी स्वराज्याची संप्पती भट- भिक्षुकांवर
आकारण उधळली गेली असेल तर त्या साठी स्वतः छत्रपती देखील तेवढेच जबाबदार आहेत . नशीब तू त्यावेळी जल्माला आलेली नव्हतीस नाहीतर माहितीच्या अधिकाराचा ( दूर ) उपयोग करून तू ब्राम्हनाबरोबरच महाराजानाही अडचणीत आणून ( तुझ्या संघटनेच्या कार्या( ?) साठी वर्गणी किंवा देणगी ( खरे तर खंडणी ) मागितली असतीस इतकेच नव्हेतर आगरा दौरा , सुरतेची लुट , गड किल्यांची बांधकामे , शस्र खरेदी व  निर्मिती , लग्न-कार्ये , युद्ध ,तह, मोहिमा या सगळ्या घटना मधे
ब्राम्हनासाठी किती निष्कारण खर्च झाला याची ही आपण माहिती मागवली असती ....ते जाऊद्या
ते ५०,००० ब्राम्हण  तो महान सोहळा पाहण्या साठी खाण्याच्या आमिषाने व दक्षिणेच्या मिषाने निदान तेथे गेले तरी ....आपले महान पूर्वज ( वयक्तिक आपले बरेका पाटलीण बाई ) त्या वेळी कुठे काय करत होते याची आपल्या कडे नोंद आहे का ? आणि स्वराज्याचे नुकसान ऐतखाऊ पोटभरू भट भिक्शुका पेक्षा फितूर मराठ्यांनी अधिक केले ( उदा. बांदल देशमुख , चंद्रराव मोरे , खंडोजी खोपडे , बजाजी निबालकर , गणोजी शिर्के , सूर्याजी पिसाळ , किती तरी मोठी यादी आहे ज्यांनी स्वराज्याचे स्वप्नं उधळून लावण्यासाठी व उधवस्त करण्या साठी कायम प्रयत्न केले . संभाजी महाराजांची  बदनामी करणाऱ्या ब्राम्हण कलम बहाद्दरापेक्षा संभाजी महाराजांना त्यांच्या कुटुंब कबिल्या सह ( त्यात शिवाजी महाराजांच्या एक पत्नीही होत्या ) औरन्जेबा च्या तावडीत देणारा गणोजी शिर्के व बाजी घोरपडे हा आपल्या रोषाचा धनी व्हायला हवा . पण आपल्या श्री मुखातून त्याबद्दल एकही अपशब्द बाहेर पडताना दिसत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते  

Monday 17 October 2011

anita patil hajir ho

अनिता पाटील हाजीर हो

अनिता पाटील हे नाव धारण करून आपण बहुजनांच्या ( विशेषतः मराठा ) नवतरुण पिढीची
दिशाभूल करून त्यांना बहकवत आहात. आपणाला खरोखरच मराठा/ बहुजन / स्पष्टच बोलायचेतर
ब्राम्हणेतर तरुण पिढीचे प्रबोधन करायचे असेल तर  कृपया ही ' कळवळ्याची प्रीती " नव्या युगाला समोर ठेऊन दाखवा . केवळ ब्राम्हणांना आणि त्यांच्या कावेबाज कारस्थानांना नव्या पिढी समोर ठेवून काय साध्य होणार ?  भले त्यांनी पुरातन कला पासून इतिहासा पर्यंत धर्म जाती - परंपरा आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून पोटे भरली असतील   किवा आजही तुम्ही म्हणता तसा त्यांचा पोटभरू बामणी कावाचालूअसेलही, पण  तो हाणून पाडण्यासाठी  पुराणआणि इतिहासाचे दाखले देवून आणि त्यांना शिव्या देवून आमची प्रगती कशी होणार ? 
दलितांनी हीच चूक केली आणि त्यांच्या बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाची कशी धूळधाण झाली हे आपण पाहतच आहोत. आज दलित समाज एकसंध राहिलेला नाही , शहारा - शहारातइदिरानगर ,संजयगांधीनगर, राजीवगांधी नगर , आन्नाभावू साठेनगर , रमानगर, भीमनगर या नावाने नवे महारवाडे -मांगवाडे निर्माण झाले , गावातले डफडे, गावकी सुटली तरीही आजचा दलित तरुण नगरसेवाकांपासून आमदार -खासदार आणि मंत्र्यांच्या  दाराबाहेर बसून ओंजळीनेच पाणी पीत आहे .वर्गणी , मतविक्री, सभांची गर्दी या  रुपात तराळकी चालूच आहे .
मराठा तरुण ही याच मार्गाने जावा असे आपणास वाटत नाही या बाबतीत मला खात्री आहे .
म्हणूनच आपण जातीय विद्वेष निर्माण करण्या पेक्षा या तरुणांना शिक्षण , उद्योग , व्यवसाय किवा क्षमता असेल तर प्रसंगी राजकारणातही उतरायला सांगा . ब्राम्हण नेहमीच उगवत्या सूर्याला प्रणाम करत आलेले आहेत .
शिव्या देणे हा त्यांना नमविण्याचा मार्ग नाही . मराठ्यांनी सत्ता संप्पती आणि अधिकार प्राप्त करावेत . मग पहा ब्राम्हण कसे पुन्हा आपल्या पोथ्या पुराने लिहून आपल्याला देव बनवतात   

anita patil ek aadhunik masanjogi

अनिता पाटील : एक आधुनिक मसणजोगी !

सध्या मराठी ब्लॉग विश्वात अनिता पाटील नावाची कुणीतरी  स्वतःला बहुजनवादी विचारवंत
समजणारी थोर विदुषी आपल्या तद्दन उथळ चिंतनानी अक्षरश: वेचारिक दहशत माजवीत आहे.
मुळात अनिता पाटील ( ? ) स्त्री आहे की पुरुष ? की आणखी वेगळे काही ? या बाबत शाशंकता आहे .
स्वतःला फुले- शाहू - आंबेडकर यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचाराचा वारसदार
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देवत मानणारी/रा हा/ही संत परंपरेतील
फक्त तुकारामानच मानते./तो. ( बाकी सर्व संत ब्राम्हण म्हणून रद्दबातल ) ( विचारवंत ,लेखक ,स्वातंत्र्य सेनिक यासर्वांच्याबाबतीतहीया बाई /बाप्या चा हाच न्याय आहे ) एवढेच कशाला ( अगदी शिवाजी महाराजांच्या मावळ्यातही  ही /हा बाजारबुणगा ( की बाजारबसवी ) याच  जातीय  गटारीतून चिखलफेक करीत आहे .

Tuesday 11 October 2011

anna ki topi

लोकाना टोप्या घालणारेस्वतः टोप्या घालू लागले प्रत्येक वाल्याला वाल्मीकि होण्याचे स्वप्न आता पडू लागले   अन्ना सोल्ड क्याप नवी गोष्ट तयार झाली कुणालाच माहित नाहीकाय दडलय टोपी खाली  आम्हा भारतियाना नेहमीच ऐक पुंगीवाला लागतो गर्दी मधे मग  आम्ही सर्वांना रेटून पुढे असतो  रामलीला मैदानावर रामायण घडेल की महाभारतकी उपोषानाची हौस भागवून भरत येईल परत  लोकपाल येईल न येईल ऐक मात्र नक्की होइल आरत्या भजने फोटो पुतळयात नवा गाँधी आवतार घेइल  भारतीय मानसिकतेची हीच खरी गम्मत आहे महात्म्याना देव बनवण्याची परंपरा कायम आहे  राम , कृष्ण , बुद्ध ,महावीर गाँधी आसोकी आम्बेडकर सगळ्याना आम्ही बनवले देव त्यांच्या नावावर चालू आहे बिनधास्त देव-घेव  अन्नांचे काय होणार ?मी कशाला सांगायला हवे उपोषनाचा उस्तव झाल्यावर आणखी काय घडणार नवे ?

anna te mahatma

अण्णा ते महात्मा
खरे म्हणजे कुणीही कुणाला महात्मा म्हणायला कुणाची कुणाला
हरकत असण्याचे काही कारण नाही .
त्यातलेत्यात हे संबोधन अण्णा हजारे या महामानवाला  त्यांचे महागाव - राळेगणसिध्धीतील
महानागरिक , महाग्रामसभेचा -महाठराव  घेवून अण्णा बद्दलचा महादर व्यक्त करीत असतील तर कुणाला त्या बद्दल महापोटशूळ उठण्याचे काही कारण नाही .

मुळात गाव पातळीवर कुणाबद्दल काय उपाध्या लावाव्यात याला काही बंधन नाही
एखाद्या कधीकाळी तडीपार झालेल्या, दारूचे आड्डे चालवणाऱ्या , अनेक आणि केवळ काळेच
धंदे करणाऱ्या , खून- बलात्कार-खंडणी -अपहरण या सारख्या कर्तुत्वाची पार्श्वभूमी असणार्या
पण ( लोकशाहीतील लोकप्रियतेचा फंडा वापरून ) साधा नगरसेवक बनलेल्या गुंडाचा देखील
नागरी सत्कार होऊ शकतो...त्याला मानपत्र दिले जाते ....गावभर मोठमोठे होर्डीगन्स लावून
त्याचा उल्लेख महानायक . लोकमान्य ,ऐपेरीक्षाचालकांचा  हृदयसम्राट , असाही केला जातो ........
त्या तुलनेत अण्णांना त्यांच्या गावकर्यांनी महात्मा म्हणायचे ठरवले तर काय बिघडले ?
कुणीतरी असेही म्हणाले कि अण्णांना महात्मा म्हटल्या   मुळे महात्मा या उपाधीचे अवमूल्यन वेगेरे होईल ......असे काही असेल तर भारत सरकार ने तातडीने गांधीजींच्या नावाला जोडून महात्मा या शब्दाचे पेटंट घ्यायला हवे ...हो , नंतर उगाच वांधे नको ,
या वरून लहान असताना वाचलेल्या निळ्या कोल्याची  गोष्ट आठवली.  अण्णा जर कोल्हा असतील तर कधीना कधी कोल्हेकुई करतीलच ...तेव्हा त्यांचे रंगवलेले महात्मा पण उघडे पडेल
किवा असेही होईल कि हे लादलेले महात्मा पण अण्णा निभावून हि नेतील ...आणि कदाचित आधीच्या महात्म्यांपेक्षा मोठे योगदान त्यांचे हातून घडेल, आणि असे घडू नये असे कोण म्हणेल ?
आणि जरी असे म्हटले किवा कुणी अगदी ठरवून असे होऊ नये या साठी प्रयत्न केले तरी कुणाचे महात्मा बनणे कुणी रोखू शकत  नसते ..... प्राचीन काळापासून आधुनिक जगाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर कुणालाही हे पटेल ......मग अण्णाना महात्मा बनण्याची संधी नाकारणारे तुम्ही आम्ही कोण ?  जर अण्णा त्या लायकीचे नसतील तर काळाच्या कसोटीवर टिकणार नाहीत ......आणि असतील तर काळाला पुरून उरतील .......

Monday 10 October 2011

namskar ramram -

नमस्कार....राम राम .....

आज आपली ही पहिलीच भेट असल्याने

अधिक बोलणे टाळून नमस्कार ...राम राम करून

थांबूया ....पुन्हा भेटू लवकरच