Friday 9 December 2011

ajab story

शामची आई ; दादाहरीचा आजोबा
भोपळ्याची चोरी आणि अनिताचा सर्व्हे !

आमच्या अनिता बाई गेले ५ दिवस ब्लोग वरून गायब आहेत; भोपळा तसा पचायला सुलभ असतो . पण आमच्या
अनिता बाईना तो चांगलाच बाधलेला दिसतोय.
काय आहे ; सानेगुरुजी सारख्या सरळ साध्या निरपेक्ष
माणसावर ते केवळ जातीने ब्राम्हण आहेत म्हणून वाटेल ते
आरोप करणे ; पुस्तकातले संदर्भ घेवून " शामची आई आदर्श कशी ?" असा बेमुरवत प्रश्न विचारणे आणि त्याचा आधार घेवून
या आत्मचरित्र वजा कादंबरीच्या हेतू आणि उद्देशावरच
प्रश्नचिन्ह निर्माणकरून समाजात जातीय मळभ निर्माण करणे
ही अनिताबाईची प्रवूत्ती मला घातक वाटली ;
मी काही ब्राम्हणाची बाजू घेवून किंवा दलितांचा द्वेषी म्हणून
हा "भोपळ्याचा लढा" लढलेलो नाही . मी स्वतः जातीने  मराठा
आहे , मराठा आणि बहुजनांचा उद्धार आणि प्रगती व्हावी
व त्या साठी मराठा बहुजनांच्या तरुण पिढीने श्रम अप्रतिष्ठेचा न्यूनगंड आणि जाती श्रेष्ठत्वाचा अहंगंड सोडून शिक्षण , उद्योग ,
व्यवसाय , कला , क्रीडा , साहित्य , आदी क्षेत्रात हिरारीने उतरले पाहिजे , ब्राम्हण आम्हाला अडसर ठरतात , असे म्हणून कसे चालेल ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ब्राम्हण नव्हते का ? त्यांनी तर आपल्या स्वराज्याच्या कामात ब्राम्हणांचे
सहकार्य देखील घेतले.  अनिता बाई जांच्यात धमक आणि क्षमता असते त्यांना त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टां पासून कोणीही रोखू शकत नाही ; ज्यांच्यात मुळात कुवत नसते
ते मात्र आपल्या अपयशाचे खापर फोडण्या साठी डोकी शोधत
फिरत असतात ; आपण उपस्थित केलेले  ....
१) शामची आई आदर्श कशी ?
२) ज्ञानपीठ पुरस्कार ब्राम्हनानच कसे ?
३) ब्राम्हणाचे गो- मांस भक्षण
४) शिवराज्यभिषाकातील ब्राम्हणाच्या जेवणावळी
    आणि दानधर्म
५ ) परशुरामाच्या भाकड कथा
६ ) मराठ्यांना धर्मांतराचा अनाहूत सल्ला
आणि आपण आपल्या ब्लोग आणि फेसबुक वरून केलेले
संदेशवहन हे सर्व पहिल्या वाचल्या नंतर कुणाही सुज्ञ माणसाला अस्वस्थ झाल्या शिवाय राहवणार नाही ;
मी तर केवळ अस्वस्थ नव्हे चिंतीत झालो . आपण चक्क
मराठा जिहाद उभा करण्याची बीजे पेरत होतात ; ही विषवल्ली
रुजू न देता मुळापासून उखडून फेकण्या साठी मी आपल्या विरुद्ध दंड थोपटले आहेत ; मुद्दा शामची आई ; माझे आजोबा ;
भोपळ्याची चोरी आणि आपण लावलेला सर्व्हे हा नाही
ते केवळ निमित्त आहे ;


No comments:

Post a Comment