Saturday 3 December 2011

mi ghabarat nahi

होऊन जाऊदे पर्दाफाश !

पांडवांचा अज्ञातवासाचा आधार घेवून स्वतःच्या वाटमारीला थेट धर्मयुद्धाचा
मुलामा चढवू पाहणाऱ्या बृहन्नडे हा अज्ञातवास सोडून तू प्रथम स्वतः हून जाहीरपणे
तुझी खरी ओळख सर्वाना सांग. हे असे नथीतून तीर मारलेस तर तुला मी याच भाषेत बोलणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगतो .
आणि माझी तहकिकात वेगेरे  करण्याची किंवा माझ्या कोणा विरोधकांनी किंवा
माझ्या विद्यार्थ्यांनी तुला माझ्या काय कहाण्या व गुजगोष्टी सांगितल्या आहेत
त्याची जाहीर चिरफाड करणार अशा धमक्या दिल्यास म्हणजे मी तुला मराठा -
बहुजनाच्या तरुण पिढीचा बुद्धीभेद  करण्यासाठी रान मोकळे सोडील या भ्रमात आजीबात
राहू नकोस . " मोडेल पण वाकणार नाही , मारेल किंवा मारेल पण हटणार नाही "
हा मरगठ्ठा बाणा माझ्या रक्तात आहे ; तुझ्या पोकळ धमक्यांना मी आजीबात भीक
घालणार नाही .
तू कोण आहेस हे मी आणि मीच सर्वाना सांगू शकतो ; मी तुला केव्हाच ओळखले आहे .
पण तू ते स्वतःच जाहीर करावेस ही माझी तुला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे .
आणि एकदा ब्लोग किंवा फेसबुक सारख्या सार्वजनिक विश्वात उडी घेतल्या नंतर 
पुन्हा माझ्याशी खाजगीत  संपर्क करून माझी गुपिते उघड करण्याची धमकी देवून
माझे लेखन अनुकूल गटात करून घेण्याचा प्रयत्न करणे याला ब्ल्याक्मेलिंग म्हणतात .
स्वतःला भारतीय समाजाची सखोल आणि संदर्भीय अभ्यासक म्हणवणाऱ्या भल्या
माणसा स्वतःचे विचार मांडताना तुला स्वतःची ओळख लपविण्याची गरज भासते हाच 
तुझा पराभव आहे ,,,,,,,,हिम्मत असेल तर आधी अंगावर घेतलेली घोंगडी काढ
आणि मग हे विचार मंथनाचे आग्या मोहळ उठव......पण मला माहित आहे
ती हिम्मत तुझ्यात नाही " तू तरवडाला मोहळ शोधून बीड्याच्या धुरात
माशा आंधळ्या करून मोकाल्लेल्या पोळ्या गोळा करणाऱ्या परंपरेतली ( ला )
आहेस ,,,,,,,तुला मी घाबरेण आणि तुझे हे कांद्याने कांदा सडवण्याचे उद्योग
खपवून घेयील असा  चुकून ही समज करून घेऊ नकोस ; 
होऊन जाऊदे पर्दाफाश .....मी तयार आहे ......पण एक लक्षात ठेव एकदा तलवारी 
उपसल्याकी त्यांना खून चढवल्या शिवाय म्यान करता येत नाही .....चालविल्या कि दोन्ही कडचे
रक्त सांडल्या शिवाय गत्यंतर नसते ......होऊन जाऊदे .....निदान या निमित्ताने तू कोण हे तरी जगाला
कळेल .... आणि तुझे हे जे काही वेचारिकतेच्या नावावर थोतांड चालले आहे त्याचाही जाहीर
न्याय निवडा होयील .....काला सच काय आणि सफेद झूट काय हे लोकांना ठरवू दे  तेंव्हा आता खाजगीत बोलूच नकोस ...मराठा किंवा बहुजन म्हणून
माझ्या बद्दल सोम्यताही बाळगू नकोस ...माझ्या कडूनही तशी अपेक्षा करू नकोस.

1 comment:

  1. दादाहरि जी,

    तुम्हाला त्या अनितच खर नाव सांगायच नसेल तर सांगू नका.पण ती पुरूषच आहे न? अशात तुमचे विचार तिच्याशी फ़ार जुळत आहेत असे दिसतय. बहुजनांचा उद्धार हा खोट पसरवुन होत नाही. सत्य जे आहे ते स्वीकारावच.तुम्हाला ती धमकी देत असेल तर खरे तर तुम्ही तिचे नाव जाहिर करावेच. सत्याला भ्यायचे कसले? नाही का?पुढे तुमची मर्जी

    ReplyDelete