Friday 9 December 2011

ajab story

शामची आई ; दादाहरीचा आजोबा
भोपळ्याची चोरी आणि अनिताचा सर्व्हे !

आमच्या अनिता बाई गेले ५ दिवस ब्लोग वरून गायब आहेत; भोपळा तसा पचायला सुलभ असतो . पण आमच्या
अनिता बाईना तो चांगलाच बाधलेला दिसतोय.
काय आहे ; सानेगुरुजी सारख्या सरळ साध्या निरपेक्ष
माणसावर ते केवळ जातीने ब्राम्हण आहेत म्हणून वाटेल ते
आरोप करणे ; पुस्तकातले संदर्भ घेवून " शामची आई आदर्श कशी ?" असा बेमुरवत प्रश्न विचारणे आणि त्याचा आधार घेवून
या आत्मचरित्र वजा कादंबरीच्या हेतू आणि उद्देशावरच
प्रश्नचिन्ह निर्माणकरून समाजात जातीय मळभ निर्माण करणे
ही अनिताबाईची प्रवूत्ती मला घातक वाटली ;
मी काही ब्राम्हणाची बाजू घेवून किंवा दलितांचा द्वेषी म्हणून
हा "भोपळ्याचा लढा" लढलेलो नाही . मी स्वतः जातीने  मराठा
आहे , मराठा आणि बहुजनांचा उद्धार आणि प्रगती व्हावी
व त्या साठी मराठा बहुजनांच्या तरुण पिढीने श्रम अप्रतिष्ठेचा न्यूनगंड आणि जाती श्रेष्ठत्वाचा अहंगंड सोडून शिक्षण , उद्योग ,
व्यवसाय , कला , क्रीडा , साहित्य , आदी क्षेत्रात हिरारीने उतरले पाहिजे , ब्राम्हण आम्हाला अडसर ठरतात , असे म्हणून कसे चालेल ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ब्राम्हण नव्हते का ? त्यांनी तर आपल्या स्वराज्याच्या कामात ब्राम्हणांचे
सहकार्य देखील घेतले.  अनिता बाई जांच्यात धमक आणि क्षमता असते त्यांना त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टां पासून कोणीही रोखू शकत नाही ; ज्यांच्यात मुळात कुवत नसते
ते मात्र आपल्या अपयशाचे खापर फोडण्या साठी डोकी शोधत
फिरत असतात ; आपण उपस्थित केलेले  ....
१) शामची आई आदर्श कशी ?
२) ज्ञानपीठ पुरस्कार ब्राम्हनानच कसे ?
३) ब्राम्हणाचे गो- मांस भक्षण
४) शिवराज्यभिषाकातील ब्राम्हणाच्या जेवणावळी
    आणि दानधर्म
५ ) परशुरामाच्या भाकड कथा
६ ) मराठ्यांना धर्मांतराचा अनाहूत सल्ला
आणि आपण आपल्या ब्लोग आणि फेसबुक वरून केलेले
संदेशवहन हे सर्व पहिल्या वाचल्या नंतर कुणाही सुज्ञ माणसाला अस्वस्थ झाल्या शिवाय राहवणार नाही ;
मी तर केवळ अस्वस्थ नव्हे चिंतीत झालो . आपण चक्क
मराठा जिहाद उभा करण्याची बीजे पेरत होतात ; ही विषवल्ली
रुजू न देता मुळापासून उखडून फेकण्या साठी मी आपल्या विरुद्ध दंड थोपटले आहेत ; मुद्दा शामची आई ; माझे आजोबा ;
भोपळ्याची चोरी आणि आपण लावलेला सर्व्हे हा नाही
ते केवळ निमित्त आहे ;


Tuesday 6 December 2011

ek kavita vadyachi

वाडा चिरेबंदी

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

आब-रुबाब उरला नाही
घोडे-तांगे बारदाना गेला
कळा गेली ,रया आली
घोशा सुध्धा उघडा झाला

वाडा चिरेबंदी 
तसा आजूनही आहे उभा 

शेतं आताशा पिकत नाहीत 
बळदं -पेवं भरत नाहीत
फार कशाला वर्ष भर
दाण्याला दाणा लागत नाही

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

रोजगार हमीवर सारा गाव
रोजच कामासाठी जातो
शे-पन्नास रुपये रोज
हमखास कमावतो
वाड्यातील लोकांना मात्र
बुलंद दरवाजा आडवा येतो

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

पावसाळ्यात गावातील
घरांची पडझड झाली
सरकारकडून गावाला
नुकसान भरपाई मिळाली
वाडा मात्र पडला नाही
तेव्हा त्यांनी त्याला
लाखोली वाहिली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

नोकऱ्या मागायला गेले तेव्हा
"पाटीलकी" आडवी आली
टेबला खालून आले हात
तर खिसे होते खाली
आज दुश्मन झाली वाड्याला
वाड्याचीच सावली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

एक दिवस पेपरच्या
फ्रंट पेजवर बातमी आली
अमुक तमुक गावात
सामुहिक आत्महत्या
एक कुटुंब उधवस्त

वाडा चिरे बंदी
तसा आजूनही आहे उभा

आता तेथे सार्वजनिक
धान्याचे कोठार साठले आहे ......

Monday 5 December 2011

bas aata thambva

चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक

अनिता कळले का आपला समाज कसा आहे ते ?
सखोल अभ्यासपूर्ण चिंतनपर आणि प्रगल्भ  विचार मंथना पेक्षा
आमच्या भारतीय समाजाला " भोपळ्याच्या चोरी " वर
बाजार गप्पा करण्यात अधिक रस आहे.
माझ्या आजोबाचा भोपळा कसा " टुन्नुक टुन्नुक" चाललाय बघताय ना !
असो ; आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वान दिना निमित्त मी
माझ्या आजोबाच्या वतीने ( ते आता हयात नसल्या मुळे ) संपूर्ण दलित समाजाची
आणि या घटनेतील प्रत्यक्ष पिडीत दलित व्यक्तीची जाहीर माफी मागून दिलगिरी
व्यक्त करतो.
तशीही माझ्या आजोबाना आणि त्यांच्या आम्हा सर्व वारसांना नियतीने
आणि  स्वतंत्र भारताच्या घटनेने दिलेल्या अधिकारात श्रीमती इंदिराजी गांधी यांनी
केलेल्या कमाल जमीन धारणा कायद्याने या घटनेची जबर शिक्षा या पूर्वीच दिलेली आहे ,
माझ्या आजोबांच्या १७८  एकर जमिनी पेकी १९  एकर जमीन सिलिंग ( कमाल जमीन धारणा )कायद्याने गावातील दलितांमध्ये वाटली गेली होती त्यात चाबकाने फोडलेल्या दलिताला ३ एकर जमीन मिळाली होती ' ( आज या जमिनीची किंमत ९ लाख रुपये एकर आहे ' म्हणजेच आजघडीला तो भोपळा आम्हाला २७ लाखाला पडला आहे )
तरीही अनिता मी त्या दलिताची आणि तुमच्यासह तमाम दलित सामाजीची
भोपळा चोरी च्या घटने बद्दल माझ्या आजोबाच्या वतीने जाहीर माफी मागून खेद आणि
दिलगिरी व्यक्त करतो ; फक्त एक कृपा करा मला या घटनेचा जाहीर निषेध मात्र करायला
सांगू नका ; नातू म्हणून माझ्या आजोबांचा तेवढा तरी सन्मान राखा हि त्यांचा नातू म्हणून माझी आपणास नम्र विनंती . आता हे भोपळा प्रकरण कृपया थांबवा

yala mazi harkat nahi

याला माझी हरकत नाही

प्रिय अनिता,
तू वेद ,वेदांगे ,उपनिषदे ,पुराणे, रामायण - महाभारत या सारखी महाकाव्ये
यात येणाऱ्या कथानकांचा तात्कालिक समाजव्यवस्थेचे प्रतिक म्हणून आभ्यास
करतेस की एतेहासिक सत्य म्हणून ? की केवळ कवी कल्पना म्हणून ?
हे आधी एकदा नीटपने विचारपूर्वक ठरव.
हे हि लक्षात ठेव की हे साहित्य अपोरषीय म्हणजेच कुणा एकाने लिहिलेले नसून
मोखिक म्हणजेच एकापीढी कडून दुसऱ्या पिढीकडे कथा , गोष्टी , गाणी , लोकगीते , 
लोककला , प्रवचने , स्त्रीगीते , कीर्तने , जानपदगीते , जात्यावरच्या  ओव्या , या सारख्या अनेक
माध्यामातून प्रवाहित झालेले आहे . प्रवाहित होताना त्यात स्थळ काळ व्यक्ती समाज
अशा अनेक संधर्भांची भर पडत गेलेली आहे . त्या साठी कुणा एका व्यक्ती वा समाजाला
दोष देता येणार नाही , कृष्ण या पत्र बद्दल तर बोलायलाच नको ; त्याच्यावर तर
तमासगीरानी सुध्धा हात फिरवला आहे ,
पण एकंदर तू हा विषय निवडलाच आहे तर तू या सर्व साहित्यावर चिकित्सा जरूर
कर . हरकत नाही , फक्त एकच पथ्य सांभाळ ; नेहमी प्रमाणे हरदासाची कथा मुळ पदावर
या न्यायाने पुन्हा कुणा एका जातीवर शरसंधान करण्या साठी आपला वेळ आणि बुद्धी
खर्ची घालू नकोस , तू पुन्हा त्या दिशेने जात आहेस हे ज्या क्षणी जाणवेल त्या क्षणी
हा दादाहरी तुला रोखण्या साठी तुझ्या समोर उभा ठाकलेला असेल .
तो पर्यंत तूर्तास सप्रेम नमस्कार , वडिलकीच्या नात्याने अधिकार वाणीने दोन शब्द
सुनावले ; त्या बद्दल वाईट वाटून घेवू नकोस , लेकराला मुस्कटात मारताना वळ लेकराच्या  
गालावर आणि पीळ बापाच्या पोटात पडत असतो हे लक्षात घे . जमल्यास सरोजा
नावाच्या एका आपल्याच मराठा मुलीने पाठवलेली प्रतिक्रिया मनापासून समजून उमजून
वाच ....मी सुध्धा ती प्रतिक्रिया वाचून तुझ्या बाबतीत वेगळा विचार करण्यास उदुक्त
झालो ,,,,पण याचा अर्थ असाही नाही की तू काहीही करावे आणि मी खपवून घ्यावे ,,,
याचेही भान असू द्यावे ....धन्यवाद !

Saturday 3 December 2011

mi ghabarat nahi

होऊन जाऊदे पर्दाफाश !

पांडवांचा अज्ञातवासाचा आधार घेवून स्वतःच्या वाटमारीला थेट धर्मयुद्धाचा
मुलामा चढवू पाहणाऱ्या बृहन्नडे हा अज्ञातवास सोडून तू प्रथम स्वतः हून जाहीरपणे
तुझी खरी ओळख सर्वाना सांग. हे असे नथीतून तीर मारलेस तर तुला मी याच भाषेत बोलणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगतो .
आणि माझी तहकिकात वेगेरे  करण्याची किंवा माझ्या कोणा विरोधकांनी किंवा
माझ्या विद्यार्थ्यांनी तुला माझ्या काय कहाण्या व गुजगोष्टी सांगितल्या आहेत
त्याची जाहीर चिरफाड करणार अशा धमक्या दिल्यास म्हणजे मी तुला मराठा -
बहुजनाच्या तरुण पिढीचा बुद्धीभेद  करण्यासाठी रान मोकळे सोडील या भ्रमात आजीबात
राहू नकोस . " मोडेल पण वाकणार नाही , मारेल किंवा मारेल पण हटणार नाही "
हा मरगठ्ठा बाणा माझ्या रक्तात आहे ; तुझ्या पोकळ धमक्यांना मी आजीबात भीक
घालणार नाही .
तू कोण आहेस हे मी आणि मीच सर्वाना सांगू शकतो ; मी तुला केव्हाच ओळखले आहे .
पण तू ते स्वतःच जाहीर करावेस ही माझी तुला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे .
आणि एकदा ब्लोग किंवा फेसबुक सारख्या सार्वजनिक विश्वात उडी घेतल्या नंतर 
पुन्हा माझ्याशी खाजगीत  संपर्क करून माझी गुपिते उघड करण्याची धमकी देवून
माझे लेखन अनुकूल गटात करून घेण्याचा प्रयत्न करणे याला ब्ल्याक्मेलिंग म्हणतात .
स्वतःला भारतीय समाजाची सखोल आणि संदर्भीय अभ्यासक म्हणवणाऱ्या भल्या
माणसा स्वतःचे विचार मांडताना तुला स्वतःची ओळख लपविण्याची गरज भासते हाच 
तुझा पराभव आहे ,,,,,,,,हिम्मत असेल तर आधी अंगावर घेतलेली घोंगडी काढ
आणि मग हे विचार मंथनाचे आग्या मोहळ उठव......पण मला माहित आहे
ती हिम्मत तुझ्यात नाही " तू तरवडाला मोहळ शोधून बीड्याच्या धुरात
माशा आंधळ्या करून मोकाल्लेल्या पोळ्या गोळा करणाऱ्या परंपरेतली ( ला )
आहेस ,,,,,,,तुला मी घाबरेण आणि तुझे हे कांद्याने कांदा सडवण्याचे उद्योग
खपवून घेयील असा  चुकून ही समज करून घेऊ नकोस ; 
होऊन जाऊदे पर्दाफाश .....मी तयार आहे ......पण एक लक्षात ठेव एकदा तलवारी 
उपसल्याकी त्यांना खून चढवल्या शिवाय म्यान करता येत नाही .....चालविल्या कि दोन्ही कडचे
रक्त सांडल्या शिवाय गत्यंतर नसते ......होऊन जाऊदे .....निदान या निमित्ताने तू कोण हे तरी जगाला
कळेल .... आणि तुझे हे जे काही वेचारिकतेच्या नावावर थोतांड चालले आहे त्याचाही जाहीर
न्याय निवडा होयील .....काला सच काय आणि सफेद झूट काय हे लोकांना ठरवू दे  तेंव्हा आता खाजगीत बोलूच नकोस ...मराठा किंवा बहुजन म्हणून
माझ्या बद्दल सोम्यताही बाळगू नकोस ...माझ्या कडूनही तशी अपेक्षा करू नकोस.

Friday 2 December 2011

darudyache pravachan

दारुड्याचे प्रवचन......

अनिता...एखादा दारुडा रोज गल्ली गाजवतो आणि जागवतो सुद्धा
त्याची जी काही बडबड असते त्यातही कधी तत्वज्ञान ,कधी प्रवचन ,
कधी शिवीगाळ असते. त्याचा हा रोजचा गाढव गोंधळ ऐकायला आणि पाहायला
लोक गम्मत म्हणून जमत असतात .त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन नव्हे .
पण त्या दारुड्याला मात्र ते सर्व आपले समर्थक आहेत असे वाटत असते .
काही लोक तर अश्या दारुड्याला मुद्दाम प्रोस्ताहन देवून गम्मत घेत असतात .
त्यात अधिक रंगत यावी म्हणून त्याला दारू सुद्धा पाजतात .
त्याच्या या मूर्ख बेबंद अध:पाताचा खरा त्रास मात्र त्याच्या बायका मुलांना
आई बापाला आणि खऱ्या मित्रांना भोगावा लागतो .
तुला २०,००० हजार वाचक संख्या मिळाली यातले कोण आणि किती
वाचक हॉशे गवसे नवसे प्रकारात मोडतात याची तुला कल्पना आहे काय ?
माश्या काय गुळावर बसतात आणि गुवावरही बसतात , पण तुला मिळणाऱ्या या
पेशींची अनियंत्रित वाढीला कॅन्सर म्हणतात तू त्याला शरीरसोष्ठव मानायला
लागलीस आणि हुरूळून जाऊन आणखी बेबंद पणे लिहु लागलीस तर त्याचा 
त्रास तमाम मराठा आणि बहुजन समाजाला भोगावा लागेल . हा मराठा जिहाद बंद कर
आणि एक मोलाचा सल्ला देतो हे बृहन्नडेचे सोंग सोड , हिम्मत असेल तर तू तुझ्या मुळ
स्वरुपात समोर ये .
   आणखी एक;  माझ्या आजोबांनी  ( मी लहान असताना ) शेतातला भोपळा खाण्यासाठी चोरला
म्हणून एका दलिताला चाबकाने मारले होते ही खरी घटना सांगताना मला लाज वाटण्याचे
काय कारण ? किंवा त्या मुळे माझे आजोबा पापी ठरतात असेही मला वाटत नाही ;
आज भोपळा चोरला म्हणून माफ केले आणि दुसरया दिवशी हिम्मत वाढून त्या दलितांनी  आख्खे
शेत लुटून नेले असते तर माझ्या  आजोबांनी काय करायचे होते ?
आणि त्या त्या काळाची एक रीत परंपरा असते ? हे तू कधी समजून घेणार ?
तुला माहित आहे का ? रायगडाच्या बांधकामाच्या वेळी दिंडी दरवाज्याचे बुरुज बांधताना
त्या बुरुजात ( दोनी कडच्या ) एक जेठा - जेठी ( म्हणजे घरात थोरले असणारे ) मातंग जातीचे
तरुण दाम्पत्य जिवंत पुरण्यात आले होते . त्या काळात असे बळी देण्याची प्रथा ( आता त्याला अघोरी प्रथा म्हणतात ) होती ; आता या घटनेला जबाबदार धरून तू शामची आई आणि माझ्या आजोबा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊ मांसाहेबाना सुद्धा पापी ठरवणार का ? आणि निश्चल पुरीने केलेला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक( ? )  तर सरळ सरळ एका भगताने
अघोरी विद्येच्या आधारे केलेला जादूटोणा होता , त्यात तर कशा कशाचे आणि कश्या पद्धतीने
बळी आणि अघोर कर्म केले गेले ते जाहीर पणे सांगणे ही अनर्थकारी ठरेल
असो अनिता या गोष्टी चा मतितार्थ तुला कळणार नाही ; सांगून काय उपयोग .