Wednesday 23 November 2011

tu mhantes te thik aahe pan ......

सुनिता तू म्हणतेस ते ठीक
आहे पण ...........................
सुनिता , ठाकरे मंडळी ( बाळा साहेब , उद्धव , राज , लिंबू टिंबू - आदित्य  इत्यादी वेगेरे )  
आणि त्यांच्या राजकीय भूमिका / ध्येय / धोरणे या त्यांच्या पक्षाच्या ( शिवसेना / म न से ) अंतर्गत मामला आहे . पण ठीक आहे या निमित्ताने तू थोडीशी ताळ्यावर येऊन
जमिनीवर उभी राहून आणि आजच्या काळाशी संबधित व सुसंगत लिहायला लागलीस .
हे हि नसे थोडके. सुनिता , महाराष्ट्रातल्या मराठा बहुजनच काय कोणत्याच तरुणांनी ठाकरे आणि कंपनीच्या कोणत्याच तंबूत ( कंपूत ) जाऊ नये या मताचा मी आहे . फक्त ठाकरेच
कशाला शरदरावांचा राष्ट्रवादी , सोनिया बाईंचा कोन्ग्रेस , आठवले आणि इतर दलित संघटनाचे छोटे मोठे तुकडे , बसपा / भा जा पा सारखे उपरे .....इतकेच काय अगदी मदाऱ्याचे
अस्वल ( अण्णा हजारे ) या पेकी कुणाच्याही नादाला मराठा व बहुजनांच्या नव तरुण पिढीने लागू नये .
आणि गेरसमज करून घेऊ नकोस ( छावा/ संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्मवाले / मराठा महासंघ यांच्या तर सावलीलाही उभे राहू नये )
मला सांग सुनिता या पेकी कोण धुतला तांदूळ आहे ? शिवसेनेच्या नावाने बोटे मोडून काय उपयोग ? त्यांना एवढे सगळे करून जेमतेम ५ वर्ष सत्ता मिळाली . उरलेली ४८ वर्षे या महाराष्ट्रात
बहुजनांचीच सत्ता होती ना ! तीन वर्ष मनोहर जोशी ( ब्राम्हण )  आणि २ वर्ष ७ महिने अंतुले ( मुस्लीम ) सोडले तर बाकी ४८ वर्ष मंत्रालयातल्या ६ मजल्या वरील मुख्यामंत्र्याच्या खुर्चीत
टेकलेली बुडे बहुधा मराठ्यांची आणि अपवादाने उर्वरित बहुजनांचीच होती आणि आहेत .
मंत्री मंडळातही कायम पाटील -देशमुखांचाच बोलबाला राहिलेला आहे . म्हणजेच ठाकरेंनी कितीही
पटकली आणि भा ज पा ने त्यात कितीही हवा भरली तरी महाराष्ट्रातील मराठा - बहुजन समाज
त्यांना फारशी भिक घालत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. ते इंदूर हून आले कि आणखी कुठून याचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषाकाच्या वेळी त्यांचा मूळ कुळपुरुष " शिसोदिया " होता आणि तो क्षत्रिय राजपूत होता असा वंशावळीचा पुरावा काढला होता . मग
शिवाजी राजांना सुद्धा तू परप्रांतीय म्हणणार का ग सुनिता ?
 बेताल लिहून आमच्या कडून स्त्रीदक्षिण्या ची अपेक्षा करताना हे लक्षात ठेव सुनिता कि तू स्त्री नाहीस ; बृहनडे चे रूप घेतलेला कुणी तरी बाप्याच आहेस हे आम्ही केव्हाच ओळखले आहे .
पण असो हा काही आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा नाही .
महाराष्ट्रातल्या मराठा बहुजन तरुणांनी शिवसेना / म न से / भा ज पा च्या नादी लागू नये हा तुझा मुद्दा १०० टक्के मान्य पण याच बरोबर या तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे व करिअर कडे लक्ष द्यावे
कोणत्याच राजकीय पक्ष संघटनांच्या नादी लागू नये असे सांगितले असतेस तर ते अधिक निरपेक्ष
सत्य वाटले असते . याचा अर्थ असाही नाही कि सगळ्यांनीच तिकडे पाठ फिरवावी . ज्यांचात क्षमता आहे त्यांनी खुशाल राजकारण करावे . पण कायम सतरंज्या उचलाव्या लागत असतील / दगड गोटे हातात दिले जात असतील / आणि त्या बद्दल श्रमपरिहार म्हणून दारू पाजवली जात असेल तर
या स्थितितील तरुणांनी त्वरित त्या पासून दूर व्हावे हे उत्तम .
आणि तू घाबरू नकोस सुनिता ठाकरे इतके हि अक्कल बाज नाहीत कि महाराष्ट्राला बुद्धू बनाऊ शकतील तुझ्या माहिती साठी सांगतो १९९५ ला शिवसेना भा ज पा ची जी सत्ता आली ती आमच्या
मराठा भूषण, क्रिकेट वाचस्पती, कृषीवल हृदय सम्राट , बारामती पुत्र  माननीय नामदार शरदचंद्रजी  गोविंद रावजी पवार यांच्याच महाकृपेने ! आणि आताही हाच मराठा गडी   पुन्हा त्यांच्या गोटात शिरून अंडी घालण्याच्या तयारीत आहे . तेव्हा सावधान धोका पुढूनच आहे असे नाही. तो आतून बाहेरून भोवताली
असा चोहीकडून आहे . मराठा बहुजनाच्या लेकरांना सावध करायची खरेच मनापासून तळमळ असेल तर
कुणा बद्दल वयक्तिक व जाती आधारित आकस न ठेवता त्यांना योग्य काय अयोग्य काय ते सांग .
सुनिता तू एखाद्या गोष्टीचा आभ्यास चांगला करतेस , वाद - प्रतिवाद हि प्रभावीपणे करू शकतेस
या तुझ्या कोशल्याचा विधायक दिशेने विकास व्हावा आणि त्याचा मराठा बहुजनाच्या तरुण पिढीला
फायदा व्हावा हि अपेक्षा . पुन्हा एकदा पुराण इतिहास सोडून वर्तमानात आल्या बद्दल अभिनंदन


Tuesday 22 November 2011

anarthach lavaycha tar

(अन)र्थच  लावायचा झाला तर 
.
अनिता  तुझ्या नावातच ' अ ' नीता असल्या मुळे तुझ्या कडून कुठल्या नीतिमान , विधायक आणि
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या विचार मंथनाची अपेक्षा करणार ?. खरेतर तुझ्याशी वाद - संवाद
करण्यातही काही अर्थ ( हशील ) नाही . शिंदे पाटील काय किंवा मी काय उगाच तुझ्या कडून
विधायक विचार प्रबोधनाची अपेक्षा करतो आहोत .
अनिता ज्या प्रमाणे भीष्म पितामह दुर्योधनाला तो आचार विचाराने सुधारावा म्हणून सुयोधन अशी हाक मारीत असत त्या प्रमाणे मी सुध्धा तुला आज पासून अनिता एवजी सुनिता म्हणणार आहे. ( पाहू निदान आता तरी महाभारत टाळताय का ) असो तर सुनिता प्राचीन  वेद-वेदांगे - पुराण - मध्ययुगीन इतिहास - संत- पंत साहित्य किंवा अर्वाचीन -आधुनिक साहित्य किवा प्रथा परंपरा हे त्या त्या काळाशी सुसंगत जीवन प्रणाली . समाजजीवन , समाजव्यवस्थे नुसार तयार होत असतात .
त्या सर्वच संदर्भांचा आजच्या काळाशी सापेक्ष संबध जोडून संबधित लोकांना आरोपीच्या पिंजर्यात
उभे करणे हा अन्याय आहे .
सुनिता तुला माहित नसेल पण ऐक ( मी याचे पुरावे देवू शकतो ) छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा मुख्य दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही बुरूजा
मध्ये ऐक तरुण जेठे मातंग ( मांग) दाम्पत्य जिवंत पुरले होते .त्या काळी अशी परंपरा होती .  ( आता हा सल्ला त्यांना ब्राम्हण कारभार्यांनी दिला असा कांगावा करू नकोस, नशीब समाज कि ब्राम्हण इतिहास कारांनी हि घटना पुस्तकात आणली नाही ( बखरीत आहे ) आता या वरून शिवाजी महाराजांना अंधश्रध किंवा दलित विरोधी समजत येयील का ?
आणखी ऐक संधर्भ पहा संत तुकारामांचा ऐक अभंग आहे
" राजियाचा पुत्र अपराधी देखा | तो काय आणिका दंडवेल |
    दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी ||
आता हा असा अभंग तुकोबांनी का लिहिला असावा ?
अनर्थच लावायचा तर पहा 
१ ) अफजल खानच्या आक्रमणाच्या वेळी खंडोजी खोपडा ( गाव वाचवण्या साठी ) खानाला भेटला ( त्या आधी त्याने महाराजांशी हि संपर्ग साधला होता परंतु महाराजांनी
त्यावेळी" आपले संतुक आपण पाहणे , आमचे कडे आस्तुकी लाऊ नये " असा उलट सांगावा पाठवला .या स्थितीत 
खोपड्या ने खानची भेट घेवून त्याला स्वतः च्या खर्चाने नजराणा आणि रसद देवून आपला गाव वाचवला होता ( तो खानाला सामील झाला नव्हता ) .प्रताप गडावर खान मारला गेल्या नंतर
खोपडा महाराजांना भेटायला गेला . त्या वेळी अचानक शिवाजी महाराजांनी खोपड्याचे हात पाय तोडून चौरंगा करण्याची शिक्षा दिली . शिस्त आणि फंद फितुरीला जरब व पायबंद बसावा
म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या या शिक्षेचे समर्थन करता येयील ( आपण करू )
२ ) रांझ्याच्या पाटलाला देखील आया बहिणीची बाटवणूक केली म्हणून तोफेच्या तोंडी दिले
      गेले ( हि जरब तर पाहिजेच होती )
३) प्रत्येक समयी पावलेला आणि एकदाच ( आई वरल्या मुळे सुतकात गाव सोडू न   शकल्या  मुळे समयासी न पावलेला)  नेताजी पालकर
४ ) सात साथीदार घेऊन मरणाची राड खेळलेला प्रतापराव गुजर
५ ) प्रताप गडाच्या युद्धात पराक्रम केलेला आणि शाहिस्तेखाना वरील कारवाईत शिवाजी महाराजांकडून ठरवून मारला गेलेला संभाजी कावजी
.....................सुनिता वरील सर्व प्रवाद शिवाजी राजेंचे पुत्र युवराज संभाजी कडून थोड्या फार फरकाने झाले होते ( किंवा तशी आवई उठली होती ) परंतु संभाजी राजांना त्या बद्दल कोणतीही शिक्षा झाली नाही .हाच संदर्भ घेवून तुकारामांनी वरील अभंग लिहिला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?
याच संदर्भात तुकोबांचे तोंड बंद करण्या साठी शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?


mazi bahin ashi asu sakat nahi

माझे  बहिणाबाई
अगं माझे बहिणाबाई तू स्वतःला तमाम मराठा समाजाची बहिणाबाई म्हणवतेस
आणि त्यांना ओवाळणी म्हणून जातीय विद्वेषाच्या सुपाऱ्या देतेस ?
अनिता माझी बहिण तुझ्या सारखी असू शकत नाही .
आणखी पुन्हा पुन्हा नम्रपणे विनंती पूर्वक मी तुला सांगतो कृपया मराठा तरुणाईला
बहकावण्याचा तुझा हा उद्योग बंद कर . दुधाचा म्हणून विषाचा पेला या नव तरुण मराठा
पिढीच्या ओठी लाऊ नकोस .
मी स्वतः मराठा आहे . ( आता कृपया त्या शिंदे सारखी माझी टर उडउ नकोस )
पण त्यात विशेष काय आहे ? एका आंबेडकरांच्या मुळे जसे सर्व दलित भारतरत्न ठरत नाहीत तसेच शिवाजी मुळे आम्ही सर्व मराठे छत्रपती ठरत नाहीत. तसेही शिवाजी महाराजांचे राज्य ठाणे .तळकोकण , पुणे . सिन्नर -जुन्नर , पंन्हाळा- कोल्हापूर अशा बारा मावळा  पर्यंतच होते . उर्वरित महाराष्ट्राला त्यांचा इतिहास आणि कार्य थेट स्वातंत्र्य नंतरच माहिती झाले . आपल्या मराठवाड्यात तर मराठे एकतर निजामाचे सरदार होते किंवा मग
गावात कुन्बिकी करीत होते . निजामाच्या अत्याचाराच्या गावागावातील कथा आजूनही जुने लोक सांगतात त्या ऐकल्यास तर तुझा मराठा असण्याचा आभिमान ( गर्व ) गळून पडेल .
असो सांगण्याचा मुद्दा असा कि हे सर्व उगाळण्यात आता काही अर्थ आहे का ?
भारतातील सर्व आक्रमणाना तू ब्राम्हणांना जबाबदार धरणार का ?
मुसलमान , पोर्तुगीज , इंग्रज हे सर्व ब्राम्हण मुळे इथे आले ? आणि त्यांच्या मुळे आम्ही ९०० वर्ष गुलामीत आमचे अस्तित्व हरवून बसलो ? स्वतः च्या स्वार्था साठी एकमेकाच्या
उरावर बसणारी आमच्या रक्तात भिनलेली भाऊबंदकी, जमिनीच्या तुकड्या साठी ,इनामासाठी ,सरदारकी , जहागिरी साठी हपापलेली आमची बेदील बेबंद मराठ्यांची डोक्यालिटी आजूनही आमच्या गुण सूत्रात अनुवंशिकतेने कायम आहे . तू स्वतःच्या गावात ( घरातही ) हे पहिले असशील . आम्ही मराठे १० / १० फुटाचे बांध पडीक पाडू पण भावाचे पट भर वावर हडपण्यात आम्हाला जीवन धन्य झाल्या सारखे वाटते . गावातल्या मारवाड्याला , तालुक्याच्या आमदाराला झेडपी मेंबर ला त्याच्या पोर पोरीच्या लग्नात  आम्ही मोठ मोठ्या भेटी देतो पण गरीब भावाच्या लेकीच्या लग्नात मदती एवजी विघ्न आणण्याचा बेरकी पणा दाखवतो
गढीची जागा मारवाड्याला विकून गढीच्या माती साठी एकमेकाचे मुडदे पाडणारे पाडणारे
मराठे तुला पाहायचेत ? मी दाखवतो . कधी येतेस माझ्या बरोबर बोल ? शेतं पडीक पडून
बायको ( पाटलीन बाई ) गावात रोजंदारीने जाते . पोरगा गावात टुकार सारखा कपाळाला टिळे लाऊन फिरतो . आणि पाटील कडक टोपी घालून बगलेत पुण्य नगरी ची पीळकांडी
ठेऊन तालुक्याला ( बिनकामाचा ) भटकतो ( संध्या काळी कुणाकडून तरी देशी मिळवण्या साठी ) हे चित्र पाहायला येतेस माझ्या बरोबर ? हे मराठे सुधार अनिता ...हे मराठे सुधार ....ब्राम्हणांना दोष देऊन काहीही बदलणार नाही
आमचा र्हास नेमका कुणा मुळे झाला ? अनिता साप निघून गेला आहे तू साप म्हणून
भुई धोपटत आहेस . त्याचा काही उपयोग नाही .


va rekha tai

व्वा रेखा ताई !
तुझे नाव छम्मक छल्लो आहे ते कदाचित ब्लोग साठी घेतलेले टोपण नाव असेल
मी पण ब्लोग वर दादा हरी या टोपण नावाने लिहितो .
खरे सांगुका रेखा , तू जी काही प्रतिक्रिया लिहिली आहेस ती अफलातून आहे .
तुझ्या उपहास शेलीला मनापासून दाद आणि सलाम .
काय सांगू या आनिताने गेले काही महिने ब्लोग आणि फेसबुक वरून जो मराठा जिहाद
चा उछाद मांडला आहे त्यामुळे फेसबुक आणि ब्लोग वर भेट देणाऱ्या मराठा आणि ब्राम्हण मुलां मध्ये कमालीचा विद्वेष निर्माण होऊ लागला होता . माझ्या काही विद्यार्थ्यांनी ( विद्यार्थिनी सुध्धा ) मला हा मराठा दहशतवाद लक्षात आणून दिला . अनिता नावाची कुणीतरी जातीय अहंगंडाने पछाडलेली एक बाई ( ?) विचारवंतांचा / आभ्यासुपनाचा/ चिंतन
आणि प्रबोधनाचा आभास निर्माण करून इतिहास आणि पुराणाचे सोयीचे संदर्भ आणि अर्थ -अन्वयार्थ काढून नव्या पिढीची दिशाभूल करीत आहे . पण कुणीच या बद्दल तिला काही बोलण्याची हिम्मत करीत नव्हते . ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना या अनिताने जाहीर अपमानित केले . असे असताना मी तिच्या या लिखाण बद्दल लिहिले .
तुला त्यातील मर्म उमजले आणि तू अतिशय मार्मिक पणे त्यावर टिप्पणी केली
त्या बद्दल धन्य वाद

Tuesday 15 November 2011

anita ( ? ) patil yansi

प्रिय  अनिता

मला तुझ्या लेखन आणि प्रबोधना बद्दल आजीबात आक्षेप नाही
मला तू ओळखतेस / ओळखतोस ही आणखी चांगली गोष्ट झाली.
तू तुझी ओळख लपवून का लिहितेस / लिहितोस ?
ज्यांना खरोखर समाज प्रबोधन करायचे असते त्यांनी समाजाचा रोष सहन करण्याची देखील मानसिक /शारीरिक तयारी ठेवावी लागते . तुकारामाला आदर्श मानताना फक्त त्यांचा परखडपणाच नाही तर खुले पणाही आपण आदर्श म्हणून स्वीकारला पाहिजे. तुकारामांनी
अनंत संकटे ( अगदी मृत्यू देखील ) स्वीकारून आपले समाज प्रबोधनाचे कार्य केले . पण कधीही ओळख लपविली नाही .
आपण लिहित चांगले आहात . त्यात आभ्यास आणि चिंतन ही आहे . पण आपण जे लिहितोय ते या सायबर युगात समाजाला पुढे नेणारे / काही दिशा देणारे आहे की
जुन्या जखमांना चिघळून दुहीची बीजे पेरणारे आहे ? हे तुम्हीच पहा .
इतिहासाचा आभिमान जरूर असावा . त्यातून प्रेरणा ही घ्यावी . पण समाजात तेढ निर्माण होईल असे संदर्भ उकरून काढणे हे विचारवंतांचे / समाज प्रबोधकांचे काम नव्हे .
हं......जर आपण छावा / संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्म या सारख्या संघटनाशी
संबधित असाल तर आपले हे वेचारिक अभियान आपणास लखलाभ . मग आपणास काही  सांगण्यास काही अर्थ नाही .
                                                                                 धन्यवाद ! 

                                                                          आपला
                                                                          रवींद्र तहकिक

Tuesday 8 November 2011

tukoba aani shivba

तुकोबा आणि शिवबा


मला संत तुकाराम महाराजां बद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल नितांत आदर आहे. आपले भाग्य म्हणून तुकाबांच्या रुपात एक देवमाणूस आणि शिवबांच्या रुपात देवदुर्लभ महापुरुष महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुळेच महाराष्ट्राच्या मातीत सुजन्य आणि वीरता रुजली. ( त्यांनी रुजवलेल्या या बीजामुळेच तेंव्हा आणि आजही आपण बामणी कावा/ काही मराठ्यांची फंद- फितुरी आणि मोगली-इग्रजी - काँग्रेसी - शिवशाही ( बाळशाही ) , शारद्शाही इत्यादी आक्रमणातही टिकून आहोत )

पण मला इथे एका वेगळ्याच मुद्दया कडे आपले लक्ष वेधायचे आहे
तुकोबा आणि शिवबा एकाच कालखंडातील आहेत हे आपणास माहितीच आहे .
काहींच्या मते शिवबा तुकोबांना भेटले देखील होते . शिवबांनी तुकोबांना नजराणा पाठवला होता अशीही एक दंत कथा इतिहास म्हणून सांगितली जाते .
असे जर असेल तर मग
१) ज्यावेळी देहूतील ब्राम्हणांनी तुकोबांना त्यांची गाथा डोहात बुडवायला सांगितली
   त्यावेळी त्या परिसराचे सरदार ( जवळपास राजेच ) असणाऱ्या शिवबांनी ही घटना का   
होऊ दिली ( गाथा बुडवण्याची घटना अचानक नाही तर धर्म  पीठ बोलावून, तुक्या वेदिक धर्म विरोधी विचार मांडीत असल्याचे आरोप ठेवून , तुकारामांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याचे नाटक वठवून  समारंभ पूर्वक करण्यात आली होती . गाथेचे बाड खुद्द तुकाराम महाराजांच्या डोक्यावर देवून मागे त्यांचे सर्व टाळकरी / वारकरी चालवत नेवून संत विचाराची धिंड आणि नंतर खून ( पाण्यात बुडवून ) करण्यात आला . ही सर्व प्रक्रिया चार दिवस चालली . तरीही तेथून चार कोसावर असणाऱ्या शिवबांनी हे का रोखले नाही ?

bare mag ?

अनिता बाई समजा तुमच्या तर्क आणि आभ्यास नुसार ब्राम्हण गोमांस भक्षण करीत होते
तर आज ४/५ हजार वर्ष नंतर ते सिद्ध  करून तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?
शेतीचा शोध लागण्या पूर्वी फळे कंदमुळे आणि शिकार करून त्या प्राणी किवा पक्षांचे मांस खाणे या शिवाय दुसरा पर्याय काय होता ? त्यातली त्यात गाय सोपी ( स्वभावाने गरीब, सहज उपलब्ध , आणि भरपूर मांस असणारी ) म्हणून तिचे मांस जास्त प्रमाणात खाल्ले जात असेल. ब्राम्हणांना सहसा भाकड गायी ( अव्त्सासंभावा ) दान म्हणून दिल्या जात असत . या गायींना ब्राम्हणांनी ( शेती नसलेल्या ) पाळायला हवे होते असे आपणास म्हणायचे आहे का ? ( आणि त्यांना खायला काय धोतरे फेडून द्यायची होती ?)