Tuesday 22 November 2011

mazi bahin ashi asu sakat nahi

माझे  बहिणाबाई
अगं माझे बहिणाबाई तू स्वतःला तमाम मराठा समाजाची बहिणाबाई म्हणवतेस
आणि त्यांना ओवाळणी म्हणून जातीय विद्वेषाच्या सुपाऱ्या देतेस ?
अनिता माझी बहिण तुझ्या सारखी असू शकत नाही .
आणखी पुन्हा पुन्हा नम्रपणे विनंती पूर्वक मी तुला सांगतो कृपया मराठा तरुणाईला
बहकावण्याचा तुझा हा उद्योग बंद कर . दुधाचा म्हणून विषाचा पेला या नव तरुण मराठा
पिढीच्या ओठी लाऊ नकोस .
मी स्वतः मराठा आहे . ( आता कृपया त्या शिंदे सारखी माझी टर उडउ नकोस )
पण त्यात विशेष काय आहे ? एका आंबेडकरांच्या मुळे जसे सर्व दलित भारतरत्न ठरत नाहीत तसेच शिवाजी मुळे आम्ही सर्व मराठे छत्रपती ठरत नाहीत. तसेही शिवाजी महाराजांचे राज्य ठाणे .तळकोकण , पुणे . सिन्नर -जुन्नर , पंन्हाळा- कोल्हापूर अशा बारा मावळा  पर्यंतच होते . उर्वरित महाराष्ट्राला त्यांचा इतिहास आणि कार्य थेट स्वातंत्र्य नंतरच माहिती झाले . आपल्या मराठवाड्यात तर मराठे एकतर निजामाचे सरदार होते किंवा मग
गावात कुन्बिकी करीत होते . निजामाच्या अत्याचाराच्या गावागावातील कथा आजूनही जुने लोक सांगतात त्या ऐकल्यास तर तुझा मराठा असण्याचा आभिमान ( गर्व ) गळून पडेल .
असो सांगण्याचा मुद्दा असा कि हे सर्व उगाळण्यात आता काही अर्थ आहे का ?
भारतातील सर्व आक्रमणाना तू ब्राम्हणांना जबाबदार धरणार का ?
मुसलमान , पोर्तुगीज , इंग्रज हे सर्व ब्राम्हण मुळे इथे आले ? आणि त्यांच्या मुळे आम्ही ९०० वर्ष गुलामीत आमचे अस्तित्व हरवून बसलो ? स्वतः च्या स्वार्था साठी एकमेकाच्या
उरावर बसणारी आमच्या रक्तात भिनलेली भाऊबंदकी, जमिनीच्या तुकड्या साठी ,इनामासाठी ,सरदारकी , जहागिरी साठी हपापलेली आमची बेदील बेबंद मराठ्यांची डोक्यालिटी आजूनही आमच्या गुण सूत्रात अनुवंशिकतेने कायम आहे . तू स्वतःच्या गावात ( घरातही ) हे पहिले असशील . आम्ही मराठे १० / १० फुटाचे बांध पडीक पाडू पण भावाचे पट भर वावर हडपण्यात आम्हाला जीवन धन्य झाल्या सारखे वाटते . गावातल्या मारवाड्याला , तालुक्याच्या आमदाराला झेडपी मेंबर ला त्याच्या पोर पोरीच्या लग्नात  आम्ही मोठ मोठ्या भेटी देतो पण गरीब भावाच्या लेकीच्या लग्नात मदती एवजी विघ्न आणण्याचा बेरकी पणा दाखवतो
गढीची जागा मारवाड्याला विकून गढीच्या माती साठी एकमेकाचे मुडदे पाडणारे पाडणारे
मराठे तुला पाहायचेत ? मी दाखवतो . कधी येतेस माझ्या बरोबर बोल ? शेतं पडीक पडून
बायको ( पाटलीन बाई ) गावात रोजंदारीने जाते . पोरगा गावात टुकार सारखा कपाळाला टिळे लाऊन फिरतो . आणि पाटील कडक टोपी घालून बगलेत पुण्य नगरी ची पीळकांडी
ठेऊन तालुक्याला ( बिनकामाचा ) भटकतो ( संध्या काळी कुणाकडून तरी देशी मिळवण्या साठी ) हे चित्र पाहायला येतेस माझ्या बरोबर ? हे मराठे सुधार अनिता ...हे मराठे सुधार ....ब्राम्हणांना दोष देऊन काहीही बदलणार नाही
आमचा र्हास नेमका कुणा मुळे झाला ? अनिता साप निघून गेला आहे तू साप म्हणून
भुई धोपटत आहेस . त्याचा काही उपयोग नाही .


No comments:

Post a Comment