Tuesday 22 November 2011

anarthach lavaycha tar

(अन)र्थच  लावायचा झाला तर 
.
अनिता  तुझ्या नावातच ' अ ' नीता असल्या मुळे तुझ्या कडून कुठल्या नीतिमान , विधायक आणि
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या विचार मंथनाची अपेक्षा करणार ?. खरेतर तुझ्याशी वाद - संवाद
करण्यातही काही अर्थ ( हशील ) नाही . शिंदे पाटील काय किंवा मी काय उगाच तुझ्या कडून
विधायक विचार प्रबोधनाची अपेक्षा करतो आहोत .
अनिता ज्या प्रमाणे भीष्म पितामह दुर्योधनाला तो आचार विचाराने सुधारावा म्हणून सुयोधन अशी हाक मारीत असत त्या प्रमाणे मी सुध्धा तुला आज पासून अनिता एवजी सुनिता म्हणणार आहे. ( पाहू निदान आता तरी महाभारत टाळताय का ) असो तर सुनिता प्राचीन  वेद-वेदांगे - पुराण - मध्ययुगीन इतिहास - संत- पंत साहित्य किंवा अर्वाचीन -आधुनिक साहित्य किवा प्रथा परंपरा हे त्या त्या काळाशी सुसंगत जीवन प्रणाली . समाजजीवन , समाजव्यवस्थे नुसार तयार होत असतात .
त्या सर्वच संदर्भांचा आजच्या काळाशी सापेक्ष संबध जोडून संबधित लोकांना आरोपीच्या पिंजर्यात
उभे करणे हा अन्याय आहे .
सुनिता तुला माहित नसेल पण ऐक ( मी याचे पुरावे देवू शकतो ) छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा मुख्य दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही बुरूजा
मध्ये ऐक तरुण जेठे मातंग ( मांग) दाम्पत्य जिवंत पुरले होते .त्या काळी अशी परंपरा होती .  ( आता हा सल्ला त्यांना ब्राम्हण कारभार्यांनी दिला असा कांगावा करू नकोस, नशीब समाज कि ब्राम्हण इतिहास कारांनी हि घटना पुस्तकात आणली नाही ( बखरीत आहे ) आता या वरून शिवाजी महाराजांना अंधश्रध किंवा दलित विरोधी समजत येयील का ?
आणखी ऐक संधर्भ पहा संत तुकारामांचा ऐक अभंग आहे
" राजियाचा पुत्र अपराधी देखा | तो काय आणिका दंडवेल |
    दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी ||
आता हा असा अभंग तुकोबांनी का लिहिला असावा ?
अनर्थच लावायचा तर पहा 
१ ) अफजल खानच्या आक्रमणाच्या वेळी खंडोजी खोपडा ( गाव वाचवण्या साठी ) खानाला भेटला ( त्या आधी त्याने महाराजांशी हि संपर्ग साधला होता परंतु महाराजांनी
त्यावेळी" आपले संतुक आपण पाहणे , आमचे कडे आस्तुकी लाऊ नये " असा उलट सांगावा पाठवला .या स्थितीत 
खोपड्या ने खानची भेट घेवून त्याला स्वतः च्या खर्चाने नजराणा आणि रसद देवून आपला गाव वाचवला होता ( तो खानाला सामील झाला नव्हता ) .प्रताप गडावर खान मारला गेल्या नंतर
खोपडा महाराजांना भेटायला गेला . त्या वेळी अचानक शिवाजी महाराजांनी खोपड्याचे हात पाय तोडून चौरंगा करण्याची शिक्षा दिली . शिस्त आणि फंद फितुरीला जरब व पायबंद बसावा
म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या या शिक्षेचे समर्थन करता येयील ( आपण करू )
२ ) रांझ्याच्या पाटलाला देखील आया बहिणीची बाटवणूक केली म्हणून तोफेच्या तोंडी दिले
      गेले ( हि जरब तर पाहिजेच होती )
३) प्रत्येक समयी पावलेला आणि एकदाच ( आई वरल्या मुळे सुतकात गाव सोडू न   शकल्या  मुळे समयासी न पावलेला)  नेताजी पालकर
४ ) सात साथीदार घेऊन मरणाची राड खेळलेला प्रतापराव गुजर
५ ) प्रताप गडाच्या युद्धात पराक्रम केलेला आणि शाहिस्तेखाना वरील कारवाईत शिवाजी महाराजांकडून ठरवून मारला गेलेला संभाजी कावजी
.....................सुनिता वरील सर्व प्रवाद शिवाजी राजेंचे पुत्र युवराज संभाजी कडून थोड्या फार फरकाने झाले होते ( किंवा तशी आवई उठली होती ) परंतु संभाजी राजांना त्या बद्दल कोणतीही शिक्षा झाली नाही .हाच संदर्भ घेवून तुकारामांनी वरील अभंग लिहिला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?
याच संदर्भात तुकोबांचे तोंड बंद करण्या साठी शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?


No comments:

Post a Comment