Tuesday 11 October 2011

anna te mahatma

अण्णा ते महात्मा
खरे म्हणजे कुणीही कुणाला महात्मा म्हणायला कुणाची कुणाला
हरकत असण्याचे काही कारण नाही .
त्यातलेत्यात हे संबोधन अण्णा हजारे या महामानवाला  त्यांचे महागाव - राळेगणसिध्धीतील
महानागरिक , महाग्रामसभेचा -महाठराव  घेवून अण्णा बद्दलचा महादर व्यक्त करीत असतील तर कुणाला त्या बद्दल महापोटशूळ उठण्याचे काही कारण नाही .

मुळात गाव पातळीवर कुणाबद्दल काय उपाध्या लावाव्यात याला काही बंधन नाही
एखाद्या कधीकाळी तडीपार झालेल्या, दारूचे आड्डे चालवणाऱ्या , अनेक आणि केवळ काळेच
धंदे करणाऱ्या , खून- बलात्कार-खंडणी -अपहरण या सारख्या कर्तुत्वाची पार्श्वभूमी असणार्या
पण ( लोकशाहीतील लोकप्रियतेचा फंडा वापरून ) साधा नगरसेवक बनलेल्या गुंडाचा देखील
नागरी सत्कार होऊ शकतो...त्याला मानपत्र दिले जाते ....गावभर मोठमोठे होर्डीगन्स लावून
त्याचा उल्लेख महानायक . लोकमान्य ,ऐपेरीक्षाचालकांचा  हृदयसम्राट , असाही केला जातो ........
त्या तुलनेत अण्णांना त्यांच्या गावकर्यांनी महात्मा म्हणायचे ठरवले तर काय बिघडले ?
कुणीतरी असेही म्हणाले कि अण्णांना महात्मा म्हटल्या   मुळे महात्मा या उपाधीचे अवमूल्यन वेगेरे होईल ......असे काही असेल तर भारत सरकार ने तातडीने गांधीजींच्या नावाला जोडून महात्मा या शब्दाचे पेटंट घ्यायला हवे ...हो , नंतर उगाच वांधे नको ,
या वरून लहान असताना वाचलेल्या निळ्या कोल्याची  गोष्ट आठवली.  अण्णा जर कोल्हा असतील तर कधीना कधी कोल्हेकुई करतीलच ...तेव्हा त्यांचे रंगवलेले महात्मा पण उघडे पडेल
किवा असेही होईल कि हे लादलेले महात्मा पण अण्णा निभावून हि नेतील ...आणि कदाचित आधीच्या महात्म्यांपेक्षा मोठे योगदान त्यांचे हातून घडेल, आणि असे घडू नये असे कोण म्हणेल ?
आणि जरी असे म्हटले किवा कुणी अगदी ठरवून असे होऊ नये या साठी प्रयत्न केले तरी कुणाचे महात्मा बनणे कुणी रोखू शकत  नसते ..... प्राचीन काळापासून आधुनिक जगाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर कुणालाही हे पटेल ......मग अण्णाना महात्मा बनण्याची संधी नाकारणारे तुम्ही आम्ही कोण ?  जर अण्णा त्या लायकीचे नसतील तर काळाच्या कसोटीवर टिकणार नाहीत ......आणि असतील तर काळाला पुरून उरतील .......

No comments:

Post a Comment