Monday, 24 September 2012

निदान घाणीवर माती तरी टाका रे !

   दै . लोकसत्ता पूर्वी एक तरतमभाव जपणारे जबाबदार दैनिक होते. मराठी पत्रकारितेत आदराने घेतली जाणारी जी नावे आहेत त्यात दै . लोकसत्ताच्या माजी संपादकांची नावे मोठ्या संखेने आहेत. परंतु गेल्या काही वर्षात लोकसत्ताने ताळ आणि तंत्र दोन्हीशी फारकत घेतली आहे; ( पुण्यातल्या  बुधवार पेठेत (चिवडा गल्लीत ) मुख्य कार्यालय असल्यावर आणखी काय होणार ?) . नुकताच लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारीय पुरवणीत निखिलेश  असलेकर नावाच्या ऐका भाषा संशोधकाचा (?)
'' भाषा कूस बदलते आहे '' हा लेख वाचनात आला . या लेखात भाषेचे नवीन वाक्प्रचार सांगण्याच्या भरात ( हले डुले महात्मा फुले याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. ) आता हा '' हले डुले महात्मा फुले'' हा वाक्प्रचार म्हणा किंवा म्हण म्हणा या असलेकरने कुठे एकला किंवा कुठे वाचला कुणास ठाऊक ? परंतु या निम्मिताने त्याने आपली फुले द्वेषाची कूस( की खाज )  उजवून घेतली हें निश्चित !
. सगळ्याच महापुरुष बद्दल कट्ट्यावरच्या टुकार कंपूत अश्या प्रकारची शेरेबाजी चालते. ही पोरे ( आता जातीचा उल्लेख करतो ) ब्राम्हणाची असतील तर ते शिवाजी / महात्मा फुले /आंबेडकर / बुद्ध यांच्या बद्दल आणि संघोटे ( आर एस एस चे )असतील तर  पंडित नेहरू / गांधीजी / इंदिरा गांधी बद्दल अचकट विचकट शेरेबाजी करतात म्हणून ती समाजभाषा होत नाही याचे तारतम्य असलेकरला नसले तरी तो लेख छापणाऱ्या लोकसत्ताने ठेवायला हवे होते .
      असलेकरला माराठीभाषा आणि त्यात नवीन शब्दांची पडणारी भर या बद्दल लिहायचे असावे. परंतु  लेखाचा मथळाच त्याला भाषाशास्राबद्दल किती अक्कल आहे ते ढळढळीतपणे सांगतो. कूस बदलून प्रत्येकवेळी वेगळ्या
पुरुषाच्या बाहुपाशात घुसायला भाषा म्हणजे कुणी बाजारबसवी नाही !! भाषा  अखंड अविरत प्रवाही नदी सारखी
असतेजी उगमापासून जशी जशी पुढे जाईल तशी अधिक अधिक समृद्ध संपन्न आणि उदार होत जाते तिचा प्रवाह समकालीन समाजभूमीला सुपीक करतो आणि त्या भूमीचे अवशेष -अंशही आपल्या सोबत घेऊन पुढे जात राहतो  ( परंतु भाषा कधी कूस बदलत नाही/ अपवाद संस्कृत  )
      मराठी भाषेतही असे अनेक बदल झाले. अगदी ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकारामांची मराठी यातही फरक आहे. त्याच काळात शिवाजी महाराजांची दरबारी मराठी आणखी वेगळी होती. भाषेची ढब बरा कोसावर बदलते
आणि प्रत्येक पिढीत तर त्यात अमुलाग्र परिवर्तन होते. हा भाषाशास्राचा सर्वसाधारण नियम आहे. भाषेत नवेशब्द सतत तयार होणे हा भाषा जिवंत असल्याचे लक्षण आहे. म्हणून नव्या शब्दांची निर्मिती म्हणजे कूस बदलणे
ठरत नाही. असो !
       आमचा मुख्य आक्षेप असलेकर या महामुर्खाने नवीन म्हण म्हणून  '' हले डुले महात्मा फुले " अशी म्हण सांगितल्या बद्दल आणि त्याचा अर्थ खीळखीळीत हलती अस्थिर वस्तू असा दिल्याबद्दल आहे. मुळात अशी म्हण
कुठे अस्तित्वातच नाही !! ती असलेकारच्या सडक्या मेंदूतून आलेली आहे. बरे म्हण म्हणून एखाद्या संकल्पनेचा केलेला वापर आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असावी लागते. देवदेवता किंवा महापुरुषाबद्दल भाषेत म्हणी किंवा
वाक्प्रचार निर्माण होत नाहीत असे नाही; परंतु वापरलेला वाक्प्रचार-म्हण आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असते उदा. गुळाचा गणपती ( अतिस्थूल पिचपिचीत व्यक्ती ) , लंकेची पार्वती ( अंगावर सोने नसणारी स्त्री ) , भोळा सांब
( व्यवहार न कळणारा मनुष्य ) , भाऊगर्दी ( बघ्यांची गर्दी ) स्वतःला फार 'शाहू' समजतोस काय ? ( स्वतःला फारच 
नेकीने वागणारा समजतोस काय ) ई ई ई 
     या सर्व उदाहरणात प्रत्येक वाक्य आणि म्हण वाक्प्रचाराला काहीतरी संदर्भ साम्य आणि सुसंगती आहे. असलेकर ने जे उदाहरण सांगितले त्यात अशीकाही सुसंगती असती तर तो शब्द त्यांनी स्वतःचा म्हणून सांगितला असता तरी 
आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता , महात्मा फुले यांचे विचार -भूमिका परखड पुरोगामी आणि ठाम होत्या आणि स्वतःच्या विचार भूमिका बाबद त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही त्या साठी प्रसंगी त्यांनी वाटेल ती किंमत चुकवली , घर सोडले , समाजाने वाळीत टाकले , पुण्यातल्या भटांनी त्यांच्या आणि सावित्रीबाईच्या 
चिखल-शेण -दगड फेकले , त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले परंतु तरीही ते कधीही आपल्या कार्य भूमिका पासून तुसुभारही ढळले नाहीत कचरले नाहीत डगमगले नाहीत. असे असताना 'खीळखिळीत हलती अस्थिर वस्तू ' याअर्थाची ' हले डुले महात्मा फुले '' ही म्हण कोणत्या अर्थाने सुसंगत आहे हें असलेकर तर सांगूच शकणार नाही
परंतु ज्या लोकसत्ताने हा लेख छापला त्याच्या संपादकाने तरी त्यातील सुसंगती किंवा समर्पकता आम्हाला सांगावी आणि सांगता येत नसेल तर जाहीर माफी मागावी !!!
       आम्हाला मान्य आहे वर्तमानपत्राचा वापर दुसऱ्या दिवशी पोरांना संडासास बसविण्यासाठी होतो; परंतु लोकसत्ता तर आपले वर्तमानपत्र वाचकांच्या हातात देतानाच  संघाच्या शिबिरात पोटाला तडस लागोस्तवर   खिचडी-सार खाऊन बसता उठता पादनाऱ्या आणि जागा मिळेल तिथे हग्णाऱ्या असलेकर सारख्या संघोट्याला वापरायला देत आहे. पूर्वी अभिनव गुप्त नावाच्या ऐका संघोट्याने असाच प्रताप केला होता. आता असलेकरने तर महाप्रताप केला. लोकसत्ताला गाडगेबाबांच्या भाषेत एकच विनंती आहे '''' निदान घाणीवर माती तरी टाका रे !!"

Tuesday, 18 September 2012

]]]] संजय सोनवणी यांना जाहीर पत्र ]]]]]]]]]


श्रीमान संजय सोनवणी
स न वि वि
आपण छत्रपती संभाजी महाराजांची जी  दुर्दैवी अखेर झाली या बाबत
जी ऐतिहासिक साधने आणि ज्या तर्कांच्या आधारावर जे काही निष्कर्ष काढत
आहात ते गैरसमज निर्माण करणारे आहेत.
     आपण म्हणता त्या प्रमाणे संभाजी महाराजांबद्दल रायगडावरील मुस्तद्यात ताण-तणाव, रोष, बेबनाव ,अविश्वास आणि सुडाच्या भावना होत्या याबद्दल दुमत नाही.  संभाजी महाराजांच्या परखड, शीघ्रकोपी, प्रसंगी अततायी स्वभावामुळे आणि खलबत खाण्यातील कुटनीती,किंवा  दरबारी राजकारण या पेक्षा मैदानावरील लष्करी बाहुबळ महत्वाचे मानण्याच्या वृत्तीमुळे , शिवाजीमहाराजांच्या सोबत कामकरणार्या
दरबार्याना शंभू अति धाडसाच्या कैफात राज्य बुडवील ( राज्य बुडाले तर आपले काय ? ) अशी भीती वाटत होती हें स्वराज्याच्या अस्तित्व आणि सुरक्षे  पेक्षा स्वतःचे बुड टेकवायला सुरक्षित जागा शोधणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर
सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ पोरांनी रक्त सांडून उभारलेल्या रायगडावर कानात मोत्याच्या भिकबाळ्या आणि डोक्यावर रेशमी पगड्या घालून मिरवणारे अष्टप्रधान मंडळात मानाच्या जागा पटकावलेले तथाकथित मुस्तद्दीच होते.
( आणि हें सर्व ब्राम्हण होते/ वाटल्यास हा योगायोग किंवा अपवाद समजा )
       संभाजी महाराजांच्या अटके नंतर त्यांना सोडवण्याचा रायगडावरून काहीही प्रयत्न झाला नाही हें तर सत्यच आहे. त्यांना कट-कारस्थान करून मुकाबार्खानाच्या हवाली करण्यात आले हा देखील सत्य इतिहास आहे.
परंतु असे पहिल्यांदाच घडले होते असे नाही. खुद्द शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने आग्र्यात नजरकैदेत टाकले तेव्हादेखील रायगडावरील मुस्तद्यानी लष्कराला दैवाचे फासे उलटे पडल्याचे सांगून हातावर हात धरून
निष्क्रिय बसण्यास भाग पडले होते. जिजाऊ मा साहेबांसारख्या पुरोगामी आणि वास्तववादी विचार करणाऱ्या स्त्रीच्या शिवाजी महारा
जांविषयी हळव्या असणाऱ्या भावनांचा फायदा घेवून शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी
दबावतंत्र किंवा राजकारण करण्यापेक्षा या भटा-बामणांनी जप-आणि अनुष्ठाने घालून रायगडाची राया घालवली होती.
          केवळ आग्रा प्रसंगातच नव्हे तर पन्हाळा आणि नंतर पुरंदर प्रसंगात देखील राजा अडकला आता तो सहजा सहजी सुटण्याची शक्यता नाही हें दिसताच या भटा-बामणांनी लष्कराला गप्प बसण्यास भाग पाडले. मराठे शिपाई या भट-बामनावर श्रद्धा ठेवून असल्याने त्याचा सल्ला मनात असत. जिथे शिवबा आणि मा साहेब यांचा सल्ला मानतात मग आपण यांचे एकलेच पाहिजे ही मावळ्याची भोळी भाबडी भावना होती. त्याचाच फायदा या मंडळीनी घेतला.
        या मंडळीच्या जेव्हा असे लक्षात आले की शिवपुत्र संभाजी जर राजा झाला तर राज्य आपल्या सल्ल्याने चालणार नाही. लष्कराचा सेनापती ( त्यावेळी हंबीरराव मोहिते आणि नंतर संताजी घोरपडे ) आणि संभाजीचा वैयक्तिक सल्लागार / मित्र ( काविकलाश ) यांच्या मुळे आपले स्थान महत्व एशोआराम आणि कमाई कमी होयील तेंव्हा पासून या मंडळीनी संभाजी बद्दल अफवा /कंड्या/ गैरसमज पसरवण्याचे आणि बदनामीचे अभियान चालवले. त्या साठी त्यांनी सोयराबाईच्या मनात सावत्रपनाचे  आणि राज्यलोभाचे बीज फुलवले. जिजाऊ मा साहेबांच्या
निधनानंतर तर सोयराबाईंचा महाल कट कारस्थानाचा अड्डाच बनला. त्यांच्या कारवायांनी शिवाजी महाराज सुध्धा हतबल झाले. खचले, आजारी पडले ( की पाडले गेले ) . या मंडळीनी जिथे प्रत्यक्ष पतीच्या विरोधात पत्नीच्या मनात विष कालवले ( शिवाजी महाराज- सोयरा बाई ) , मदारी मेहतर आणि होरोजी फर्जद सारखे शिवाजी महाराजांचे विश्वासू कटात सामील करून घेतले तिथे संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थाने करण्या साठी काय काय केले नसेल आणि कुणा कुणाचा बुद्धिभेद केला नसेल ?
         संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा संगमेश्व्ह्रचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु त्या आधी असे अनेक प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांची स्त्री विषयक आदर भावना आणि स्त्रीची विटंबना करणार्याला दिली जाणारी कठोर शिक्षा
लक्षात घेऊन पहिला प्रयत्न त्याच बाबतीत झाला. त्या साठी आण्णाजी दत्तो याने खुद्द स्वतःच्या मुलीचा वापर केला. परंतु नंतर सत्य उघडकीस आले. त्यानंतरही पुन्हा एकदा याच आण्णाजी दत्तोने स्वतःच्या साडूच्या मुलीचाही वापर
करून पहिला ( तो ही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषाकाच्या गडबडीत ) हेतू हा की महाराजांनी एक तर कठोर शिक्षा करून संभाजीला कायमचे संपवावे. किंवा किमान त्याला युवराज म्हणून घोषित करु नये. परंतु हें कारस्थान
देखील फळाला आले नाही. त्या नंतर या मंडळीनी थेट शिवाजी महाराज हेच पहिले टार्गेट ठरवले. आणि त्यांनी  महाराजांच्या मनात संभाजी विषयी आणि संभाजीनाहाराजाच्या मनात महाराजांविषयी अविश्वास आणि गैरसमज
पसरवण्यास सुरुवात केली. गैरसमज एवढे टोकाचे होते की एक वेळ अशी आली की शिवाजी महाराजांना असे वाटू लागले की संभाजी आपल्या विरुध्ध बंड करून आपल्याला मरून किंवा तुरुंगात टाकून राज्य बळकावण्याची
तयारी करतोय आणि संभाजीला असे वाटत होते की आपला पिता कोणत्याही क्षणी आपल्याला अटक करून कायमचे नजरकैदेत किंवा काल कोठडीत टाकेल. या गैरसमजा पोटीच अखेरच्या काळात संभाजी-शिवाजी भेट होऊ
शकली नाही. संभाजी महाराजांकडून मोगलांना जाऊन मिळण्याची चूक घडली. या घटनेने गैरसमजांची जखम आणखीनच चिघळली. अगदी अखेरच्या काळात तर खुद्द शिवाजी महाराजच नजर कैदेत होते. त्याचा मृत्यु
कसा झाला. अंत्यविधी गुप्तपणे का उरकण्यात आला. राजाराम ला गादीवरबसविण्याची घाई कुणी केली ? हें सर्व संशयास्पद आहे.
      या घटनेनंतर संभाजी महाराजांनी पुन्हा रायगडावर ताबा मिळवल्यानंतर आणि हंबीरराव व मराठा लष्कर संभाजी महाराजांच्या पाठीशी आहे हें कळल्यावरही  रायगडावरील भट-कारस्थाने थांबली नाहीत. संभाजी महाराजांना
अकबराच्या ( औरंजेबाचा पोरगा ) हाती देण्याचा प्रयत्न झालाच. त्यात कट उघडकीस येऊन कटाचे सूत्रधार मारले गेले.
परंतु अपप्रवूत्ती बाबत एक नियम आहे. त्याचा एकदा शिरकाव झाला की मग त्या चालवणारा एक मेला किंवा मारला तरी त्याची जागा दुसरा भरून काढतो.संभाजीराजा बद्दल असेच घडले. कट वाल्यांना हत्तीच्या पायी देऊन कारस्थाने थांबली नाहीत. त्यांची संधाने थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत घाटली जात होती. गणोजी शिर्के काय किंवा नागोजी माने काय हें मोहरे होते. खुद्द राजाराम महाराजांना देखील याची कल्पना नसावी की हें जे काही काळ गप्प बसण्यास सांगितले जात आहे या मागे राजकारण नसून कटकारस्थान आहे. लष्कराचे हात बांधण्यामागे मुस्तद्दीपणा नसून संभाजीला मरू देण्याचा हेतू आहे. भटांच्या या कारस्थानं बद्दल राजाराम-, मराठा लष्कर , संताजी धनाजी , खुद्द
संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई देखील अनभिज्ञ होत्या. या सर्वाना असे वाटत होते की काहीतरी होयील परंतु काहीच होणार नाही हें फक्त भटाना माहित होते.
        संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृतू नंतर  आणि राजाराम यांच्या अकाली निधना नंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात धनाजी संताजी च्या काळात पुन्हा एकदा मराठा लष्करात चैतन्य आले. त्यात औरंगजेब जेरीस आला, हरला आणि मेला, ज्यांनी औरंगजेबाच्या राहुटीचे कळस कापून आणले त्यांना स्वतःचा राजा सोडवणे अवघड नव्हते .परंतु स्वार्थी  मतलबी   आणि संभाजी द्वेषाने पछाडलेल्या भटांनी आपली अक्कल-हुशारी लष्कराला हातावर हात धरून बसविण्यासाठी खर्ची घातली.
   भटांच्या या कारस्थानाचा अखेरचा आध्याय धनाजी-संताजीच्या बेबनावाने संपला. जो पर्यंत धनाजी-संताजी एक आहेत तो पर्यंत राज्यावर लष्कराचे वर्चस्व राहणार आणि आपला भाव कमी राहणार हें माहित असल्याने भटांनी
या मराठा शिपाई गड्यात दुहीची बीजे पेरून एकमेकांच्या जीवावर उठवले. आणि अखेरीस भट त्यात यशस्वी झाले.
त्याचा परिणाम ''''''' पेशवाई अवतरली ''''''''''
    अगदी गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवल्या पासून जी  भट कारस्थानं सुरु झाली
ती जेव्हा शनिवारवाडा उभा राहिला तेह्वाच या भटांचा पोटशूळ शांत झाला
--------------------------------------------------------------------------------------
.
                                                             आपला
                                                        प्रा. रवींद्र तहकिक
                                                          ( संपादक; अनिता पाटील विचारमंच )

Thursday, 12 April 2012

Anita Patil: अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्...

Anita Patil: अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्...: श्री. रवींद्र तहकीक यांनी एका माथेफिरू ब्राह्मणवाद्यास लिहिलेले सडेतोड पत्र. हा वादी स्वतःला   मोहक म्हणून घेतो!  तहकीक यांचा हा लेख मुद्द...

Monday, 9 April 2012

gubu gubu: sanjay sonavani yana patra

gubu gubu: sanjay sonavani yana patra: माननीय संजय सोनवणी रवींद्र तहकिक चा आपणास सप्रेम नमस्कार हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या लेखाची प्रतिक्रि...

sanjay sonavani yana patra


माननीय संजय सोनवणी
रवींद्र तहकिक चा आपणास सप्रेम नमस्कार
हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या
लेखाची प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही. प्रतुत्तर तर अजिबात नाही.
अनिता पाटील यांच्या ब्लॉग वरून प्रसिद्ध झालेल्या माझ्या
लेखा बद्दल आपण आपल्या ब्लॉग वर " तसेही अशा मूर्खाना
कोण अडवू शकतो " असा लेख लिहिला आहे. त्यात पहिल्याच वाक्यात
नव्हे लेखाच्या टायटल मधेच आपण मला उद्देशून "मूर्ख" असे संबोधन 
वापरले.त्याच बरोबर आपण हें लिखाण तालिबानी  आहे .असेही आपण म्हटले .  हा माझा गौरव निश्चितच नाही. आपण माझ्या लेखनाचा निषेध 
केला आहे असेही दिसत नाही. होय , आपण ज्या शब्दात आणि ज्या शैलीत 
हा लेख लिहिला आहे त्याला " पाणउतारा " किंवा "तेजोभंग " असे मात्र 
म्हणता  येयील . 
मला येथे वानरांच्या टोळ्यातील "म्हाल्ल्या" चे उदाहरण देण्याचा मोह होतो आहे आणि मी तो आवरू शकत नाही . वानराच्या टोळीतील बलदंड नर वानर इतर कमकुवत वानरांना मारझोड करून टोळीतून पिटाळून लावतो आणि मग नंतर
एकटाच टोळीतील सर्वा माद्या भोगत राहतो. त्याची म्हाळे पानाची लालसा इतकी तीव्र आणि निर्दयी असते की स्वतः पासून झालेल्या नर अपत्यांना देखील तो जगू देत नाही किंवा पिटाळून लावतो.
    मा . सोनवणी साहेब मी तुमच्यावर थेट असा काही आरोप करत नाही. परंतु
प्रबोधन आणि क्रांतीच्या चळवळीत देखील सुरुवातीला स्वकर्तुत्वाने इतिहास घडवणारे,
चळवळीला योग्य दिशा निश्चित उद्दिष्ट आणि यश मिळवून देणारे ,प्रसंगी जीवाची बाजी लावणारे. सर्वस्वाचा त्यागही करणारे नेतृत्व एका टप्प्यावर  मात्र हेकेखोर आणि आत्मकेंद्रित होताना दिसते. ही  आपल्या देशातल्याच नाहीतर जगाच्या इतिहासातील सर्वच चळवळीची अपरिहार्य शोकांतिका आहे . म्हणजे  माकडाचा माणूस झाला तरी
" म्हाळे" पणाचे " जीन्स " मात्र आपल्यात आजूनही कायम आहेत .  
त्यातूनच मग हें म्हाळे मी म्हणजेच संघटना. मी म्हणजेच विचार. मी म्हणजेच
चळवळ आणि मी करतो तेच खरे प्रबोधन अशी दुराग्रही व अडेलतट्टू भूमिका घेवून
नावे नेतृत्व एक तर जल्मालाच घालत नाहीत किंवा मग त्यांचा डोळा चुकवून
असे नवे नेतृत्व जल्माला आलेच तर हें "म्हाळे" पाळण्यातच त्यांच्या नरडीला
नख लाऊन संपवून टाकतात. त्यांना हव्या असतात फक्त माद्या...ज्या म्हाळ्या चे
डसणे-ओरबरडने शृंगारक्रीडा म्हणून सहन करतात. पाहजे तेंव्हा त्याच्या वासना विरेचनाचे साधन बनतात आणि त्याच्या अपत्यांना जल्माला घालतात. अपत्या
पैकी मादी जातीच्या आपल्या मुली म्हाळ्याने भोगण्यास त्यांची हरकत नसते आणि
नरबच्चाच्या नरडीचा घोट घेतल्यास त्यालाही त्यांची हरकत नसते.
   पण एक दिवस असाही एतो की या म्हाळ्याला सवाई म्हाळ्या भेटतो.
आणि पहिल्या म्हाळ्याचे अनभिषिक्त साम्राज्य नष्ट होते........एक तर म्हाळ्या
मारला जातो किंवा टोळीतून पिटाळला जातो. आणि आश्चर्य म्हणजे ज्या माद्या च्या जीवावरहा म्हाळ्या दांडगाई करत असतो त्या माद्या एका क्षणात नव्या म्हाळ्याशी
रत होतात. आर्थात नवा बलिष्ट म्हाळ्या मिळे पर्यंत.
सोनवणी साहेब कोणत्याही चळवळीचा इतिहास हा आणि  असाच असतो.
आपण असे करता आहात असे मला म्हणायचे नाही तर असे करून नये हें
आपल्या लक्षात आणून द्यायचे आहे .
   आपण एक थोर आणि साक्षेपी लेखक /विचारवंत /समीक्षक / प्रबोधक /
आहात , आपण लिखाण करताना एक विशिष्ट नियमांची आपण आखलेली 
चौकट पाळता . भाषा /लेखन विषय / शैली/ व्यक्ती / इत्यादी बाबतही 
आपण स्वतःला काही नियम आणि मर्यादा  घातल्या आहेत .असे तुम्ही
सांगितले. ही एक चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे .
परंतु प्रत्येकाने आपण ज्या वाटेवरून चालत आहात त्याच वाटेवरून चालावे .
जो असा आपल्याला योग्य वाटणाऱ्या आवडणाऱ्या /भावणाऱ्या/ मार्गाने
चालतो तो योग्य आणि जो वेगळी वाट काढून त्यावर चालू पाहतो
तो मूर्ख ......हें निसर्गदत्त न्यायाला धरून नाही असे आपणास वाटत नाही का ?
संत ज्ञानेश्वारानी असे म्हटले होते की " हंस चांगला चालतो म्हणून इतरांनी
चालूच नाही काय ? कोकिला गोड गाते म्हणून इतरांनी गाउच नये काय ?
मला देखील आपला पूर्ण आदर ठेवून असे म्हणायचे आहे की
" सोनवणी असे लिहितात म्हणून आम्हीही तसेच लिहावे काय ? "
लेखन ही देखील एक लढाई असेल तर त्यात फक्त मनात एक आणि कागदावर वेगळेच असणारे तह आणि करारनामे
किंवा ओढून ताणून अति सभ्य भाषेत खरडलेले कारकुनी कलाम असावेत असे तर आपले म्हणणे नाही ना ?
छापील लिखाणात आणि व्यासपीठावर बोलताना सभ्यता आणि शब्द शुचिता पाळणारा मनुष्य खाजगीत जर
ती पाळत नसेल तर त्याच्या त्या ढोंगी पणाला तुम्ही काय म्हणाल ? त्या पेक्षा आम्ही जर सार्वजनिकरित्या
जरा असभ्य भाषेत बोलत असू तर ( तो आमचा मूर्ख पणा)  त्या ढोंगीपणा पेक्षा अधिक पारदर्शक नाही काय ?
दुसरे महत्वाचे असे की एखादी लढाई लढत असताना आपला शत्रू तोच आमचा असावा हा आग्रह कशासाठी ?
( शत्रू हा शब्द टीका-विषय या अर्थाने घ्यावा मग तो व्यक्ती असेल किंवा विचार असेल )
आपण तर अमुक अमुक ( येथे पु ल देशपांडे ) हें अवध्य ( खून या अर्थाने नव्हे तर टीका या अर्थाने ) आहेत
असे सांगता आहात. किंवा त्या पुढे जाऊन मारायला हरकत नव्हती परंतु हत्यारे फारच धारदार वापरली ( भाषा )
आणि विनोदी लेखकाला काय मारता ? विचारवंताना मारा की असा सल्ला देता....
म्हणजे असे तर नाही ना की राजा ने लढाईत फक्त शत्रू वरच हत्यार चालवायचे. दरबारातल्या विदुषकाने
राणी साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारली तरी  त्यातल्या विनोदी (कलंदर ) वृत्तीची कदर करून दाद द्यायची !  
आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. जो असे न करता त्या विदूषकाच्या मुस्कटात भडकावून त्याला लाथे खाली
तुडवत-बडवत त्याची रवानगी कोठडीत करील तो अरसिक ...असभ्य ...इतकेच काय मूर्ख सुध्धा !
नाही काय सोनवणी साहेब !
माननीय सोनवणी साहेब, आपण  आमचे  शत्रू  निवडण्याचे
आणि त्याला कसे जेरबंद किंवा नामोहरम करायचे याचे व युद्ध तंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित
राहूद्या. त्यासाठी कोणती हत्यारे वापरायची. कसे डावपेच आखायचे. तह -करार -मदार कसे केव्हा
करायचे याचे देखील स्वातंत्र्य अबाधित राहूद्या. आमच्या तंत्र आणि पद्धतीवर आपण आक्षेप/निषेध /
टीका /टिप्पणी /सूचना /सल्ला /काहीही देवू शकता ....परंतु हें तंत्रच मुळात चुकीचे किंवा अनैतिक
सदोष अथवा अवैध आहे आणि ते वापरणारे मूर्ख आहेत असे मात्र आपण म्हणणे बरोबर नाही .
अपझल खानाला कसा निपटायचा ? हें शिवाजीला ठरवू दया ना ? कारण त्याला तिथे  शामियान्यात 
जायचे आहे .  हें नैतिक हें अनैतिक ..हें शास्राला धरून हें नियमाला सोडून ,,,,असा विचार केला असता
तर अफजलखानाचे सोडाच ..कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने ही शिवाजीचे मुंडके उडवले असते.....
नव्हे ती वेळच आली होती.....एक क्षण ...एक क्षण जरी शिवाजी महाराजांच्या मनात
ब्रम्ह हत्येची पाल चुकचुकली असती ना ......सोनवणी साहेब !   कार्यभाग बुडाला असता !!
असो आपण जेष्ठ आहात .......प्रबोधन चळवळीत आहात . अनिता प्रमाणे मी देखील आपला वाचक
आहे. मी आपला आदर करतो तो आपल्या परखड -तर्कशुद्ध आणि पुरावे व मुद्द्यावर आधारित लेखना मुळे .
परंतू याचा अर्थ असाही नव्हे की आम्ही ही आपल्याच पद्धतीचे अनुकरण करावे....
स्वतःची पध्धत वापरली म्हणून आम्ही जर मूर्ख ठरत असू तर तेही स्वीकारावे लागेल. आम्ही तुकोबा
एवढे मोठे नाही परंतु त्यांनी ही उकळते पाणी / उसाचा मार / चोरीचा आळ/ घरादाराची लिलाव बोली /
गाथेची बुडवणूक / आणि अखेर वैकुंठ गमन ( ? ) स्वीकारले ....तिथे कोणी आम्हाला मूर्ख संबोधित
असेल तर ती सुरुवात आहे.असेच म्हणावे लागेल.
..............................................आपला उपमर्द किंवा अवमान करणे हा या पत्राचा उद्देश नाही
तथापि अनावधाने असे घडले असल्यास आपली विनम्रता पूर्वक माफी मागतो ----------------------------------
                                                       
                                                                     धन्यवाद ! 
                                                                                                                       आपला
                                                                                                    प्रा. रवींद्र तहकिक
 

Saturday, 10 March 2012

प्रिय कोहम, स न वि वि
......तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा  
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. ' फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )
शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?
थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे;
आणि मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा मोहक .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?
तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?

Friday, 9 December 2011

ajab story

शामची आई ; दादाहरीचा आजोबा
भोपळ्याची चोरी आणि अनिताचा सर्व्हे !

आमच्या अनिता बाई गेले ५ दिवस ब्लोग वरून गायब आहेत; भोपळा तसा पचायला सुलभ असतो . पण आमच्या
अनिता बाईना तो चांगलाच बाधलेला दिसतोय.
काय आहे ; सानेगुरुजी सारख्या सरळ साध्या निरपेक्ष
माणसावर ते केवळ जातीने ब्राम्हण आहेत म्हणून वाटेल ते
आरोप करणे ; पुस्तकातले संदर्भ घेवून " शामची आई आदर्श कशी ?" असा बेमुरवत प्रश्न विचारणे आणि त्याचा आधार घेवून
या आत्मचरित्र वजा कादंबरीच्या हेतू आणि उद्देशावरच
प्रश्नचिन्ह निर्माणकरून समाजात जातीय मळभ निर्माण करणे
ही अनिताबाईची प्रवूत्ती मला घातक वाटली ;
मी काही ब्राम्हणाची बाजू घेवून किंवा दलितांचा द्वेषी म्हणून
हा "भोपळ्याचा लढा" लढलेलो नाही . मी स्वतः जातीने  मराठा
आहे , मराठा आणि बहुजनांचा उद्धार आणि प्रगती व्हावी
व त्या साठी मराठा बहुजनांच्या तरुण पिढीने श्रम अप्रतिष्ठेचा न्यूनगंड आणि जाती श्रेष्ठत्वाचा अहंगंड सोडून शिक्षण , उद्योग ,
व्यवसाय , कला , क्रीडा , साहित्य , आदी क्षेत्रात हिरारीने उतरले पाहिजे , ब्राम्हण आम्हाला अडसर ठरतात , असे म्हणून कसे चालेल ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ब्राम्हण नव्हते का ? त्यांनी तर आपल्या स्वराज्याच्या कामात ब्राम्हणांचे
सहकार्य देखील घेतले.  अनिता बाई जांच्यात धमक आणि क्षमता असते त्यांना त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टां पासून कोणीही रोखू शकत नाही ; ज्यांच्यात मुळात कुवत नसते
ते मात्र आपल्या अपयशाचे खापर फोडण्या साठी डोकी शोधत
फिरत असतात ; आपण उपस्थित केलेले  ....
१) शामची आई आदर्श कशी ?
२) ज्ञानपीठ पुरस्कार ब्राम्हनानच कसे ?
३) ब्राम्हणाचे गो- मांस भक्षण
४) शिवराज्यभिषाकातील ब्राम्हणाच्या जेवणावळी
    आणि दानधर्म
५ ) परशुरामाच्या भाकड कथा
६ ) मराठ्यांना धर्मांतराचा अनाहूत सल्ला
आणि आपण आपल्या ब्लोग आणि फेसबुक वरून केलेले
संदेशवहन हे सर्व पहिल्या वाचल्या नंतर कुणाही सुज्ञ माणसाला अस्वस्थ झाल्या शिवाय राहवणार नाही ;
मी तर केवळ अस्वस्थ नव्हे चिंतीत झालो . आपण चक्क
मराठा जिहाद उभा करण्याची बीजे पेरत होतात ; ही विषवल्ली
रुजू न देता मुळापासून उखडून फेकण्या साठी मी आपल्या विरुद्ध दंड थोपटले आहेत ; मुद्दा शामची आई ; माझे आजोबा ;
भोपळ्याची चोरी आणि आपण लावलेला सर्व्हे हा नाही
ते केवळ निमित्त आहे ;


Tuesday, 6 December 2011

ek kavita vadyachi

वाडा चिरेबंदी

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

आब-रुबाब उरला नाही
घोडे-तांगे बारदाना गेला
कळा गेली ,रया आली
घोशा सुध्धा उघडा झाला

वाडा चिरेबंदी 
तसा आजूनही आहे उभा 

शेतं आताशा पिकत नाहीत 
बळदं -पेवं भरत नाहीत
फार कशाला वर्ष भर
दाण्याला दाणा लागत नाही

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

रोजगार हमीवर सारा गाव
रोजच कामासाठी जातो
शे-पन्नास रुपये रोज
हमखास कमावतो
वाड्यातील लोकांना मात्र
बुलंद दरवाजा आडवा येतो

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

पावसाळ्यात गावातील
घरांची पडझड झाली
सरकारकडून गावाला
नुकसान भरपाई मिळाली
वाडा मात्र पडला नाही
तेव्हा त्यांनी त्याला
लाखोली वाहिली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

नोकऱ्या मागायला गेले तेव्हा
"पाटीलकी" आडवी आली
टेबला खालून आले हात
तर खिसे होते खाली
आज दुश्मन झाली वाड्याला
वाड्याचीच सावली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

एक दिवस पेपरच्या
फ्रंट पेजवर बातमी आली
अमुक तमुक गावात
सामुहिक आत्महत्या
एक कुटुंब उधवस्त

वाडा चिरे बंदी
तसा आजूनही आहे उभा

आता तेथे सार्वजनिक
धान्याचे कोठार साठले आहे ......

Monday, 5 December 2011

bas aata thambva

चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक

अनिता कळले का आपला समाज कसा आहे ते ?
सखोल अभ्यासपूर्ण चिंतनपर आणि प्रगल्भ  विचार मंथना पेक्षा
आमच्या भारतीय समाजाला " भोपळ्याच्या चोरी " वर
बाजार गप्पा करण्यात अधिक रस आहे.
माझ्या आजोबाचा भोपळा कसा " टुन्नुक टुन्नुक" चाललाय बघताय ना !
असो ; आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वान दिना निमित्त मी
माझ्या आजोबाच्या वतीने ( ते आता हयात नसल्या मुळे ) संपूर्ण दलित समाजाची
आणि या घटनेतील प्रत्यक्ष पिडीत दलित व्यक्तीची जाहीर माफी मागून दिलगिरी
व्यक्त करतो.
तशीही माझ्या आजोबाना आणि त्यांच्या आम्हा सर्व वारसांना नियतीने
आणि  स्वतंत्र भारताच्या घटनेने दिलेल्या अधिकारात श्रीमती इंदिराजी गांधी यांनी
केलेल्या कमाल जमीन धारणा कायद्याने या घटनेची जबर शिक्षा या पूर्वीच दिलेली आहे ,
माझ्या आजोबांच्या १७८  एकर जमिनी पेकी १९  एकर जमीन सिलिंग ( कमाल जमीन धारणा )कायद्याने गावातील दलितांमध्ये वाटली गेली होती त्यात चाबकाने फोडलेल्या दलिताला ३ एकर जमीन मिळाली होती ' ( आज या जमिनीची किंमत ९ लाख रुपये एकर आहे ' म्हणजेच आजघडीला तो भोपळा आम्हाला २७ लाखाला पडला आहे )
तरीही अनिता मी त्या दलिताची आणि तुमच्यासह तमाम दलित सामाजीची
भोपळा चोरी च्या घटने बद्दल माझ्या आजोबाच्या वतीने जाहीर माफी मागून खेद आणि
दिलगिरी व्यक्त करतो ; फक्त एक कृपा करा मला या घटनेचा जाहीर निषेध मात्र करायला
सांगू नका ; नातू म्हणून माझ्या आजोबांचा तेवढा तरी सन्मान राखा हि त्यांचा नातू म्हणून माझी आपणास नम्र विनंती . आता हे भोपळा प्रकरण कृपया थांबवा

yala mazi harkat nahi

याला माझी हरकत नाही

प्रिय अनिता,
तू वेद ,वेदांगे ,उपनिषदे ,पुराणे, रामायण - महाभारत या सारखी महाकाव्ये
यात येणाऱ्या कथानकांचा तात्कालिक समाजव्यवस्थेचे प्रतिक म्हणून आभ्यास
करतेस की एतेहासिक सत्य म्हणून ? की केवळ कवी कल्पना म्हणून ?
हे आधी एकदा नीटपने विचारपूर्वक ठरव.
हे हि लक्षात ठेव की हे साहित्य अपोरषीय म्हणजेच कुणा एकाने लिहिलेले नसून
मोखिक म्हणजेच एकापीढी कडून दुसऱ्या पिढीकडे कथा , गोष्टी , गाणी , लोकगीते , 
लोककला , प्रवचने , स्त्रीगीते , कीर्तने , जानपदगीते , जात्यावरच्या  ओव्या , या सारख्या अनेक
माध्यामातून प्रवाहित झालेले आहे . प्रवाहित होताना त्यात स्थळ काळ व्यक्ती समाज
अशा अनेक संधर्भांची भर पडत गेलेली आहे . त्या साठी कुणा एका व्यक्ती वा समाजाला
दोष देता येणार नाही , कृष्ण या पत्र बद्दल तर बोलायलाच नको ; त्याच्यावर तर
तमासगीरानी सुध्धा हात फिरवला आहे ,
पण एकंदर तू हा विषय निवडलाच आहे तर तू या सर्व साहित्यावर चिकित्सा जरूर
कर . हरकत नाही , फक्त एकच पथ्य सांभाळ ; नेहमी प्रमाणे हरदासाची कथा मुळ पदावर
या न्यायाने पुन्हा कुणा एका जातीवर शरसंधान करण्या साठी आपला वेळ आणि बुद्धी
खर्ची घालू नकोस , तू पुन्हा त्या दिशेने जात आहेस हे ज्या क्षणी जाणवेल त्या क्षणी
हा दादाहरी तुला रोखण्या साठी तुझ्या समोर उभा ठाकलेला असेल .
तो पर्यंत तूर्तास सप्रेम नमस्कार , वडिलकीच्या नात्याने अधिकार वाणीने दोन शब्द
सुनावले ; त्या बद्दल वाईट वाटून घेवू नकोस , लेकराला मुस्कटात मारताना वळ लेकराच्या  
गालावर आणि पीळ बापाच्या पोटात पडत असतो हे लक्षात घे . जमल्यास सरोजा
नावाच्या एका आपल्याच मराठा मुलीने पाठवलेली प्रतिक्रिया मनापासून समजून उमजून
वाच ....मी सुध्धा ती प्रतिक्रिया वाचून तुझ्या बाबतीत वेगळा विचार करण्यास उदुक्त
झालो ,,,,पण याचा अर्थ असाही नाही की तू काहीही करावे आणि मी खपवून घ्यावे ,,,
याचेही भान असू द्यावे ....धन्यवाद !

Saturday, 3 December 2011

mi ghabarat nahi

होऊन जाऊदे पर्दाफाश !

पांडवांचा अज्ञातवासाचा आधार घेवून स्वतःच्या वाटमारीला थेट धर्मयुद्धाचा
मुलामा चढवू पाहणाऱ्या बृहन्नडे हा अज्ञातवास सोडून तू प्रथम स्वतः हून जाहीरपणे
तुझी खरी ओळख सर्वाना सांग. हे असे नथीतून तीर मारलेस तर तुला मी याच भाषेत बोलणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगतो .
आणि माझी तहकिकात वेगेरे  करण्याची किंवा माझ्या कोणा विरोधकांनी किंवा
माझ्या विद्यार्थ्यांनी तुला माझ्या काय कहाण्या व गुजगोष्टी सांगितल्या आहेत
त्याची जाहीर चिरफाड करणार अशा धमक्या दिल्यास म्हणजे मी तुला मराठा -
बहुजनाच्या तरुण पिढीचा बुद्धीभेद  करण्यासाठी रान मोकळे सोडील या भ्रमात आजीबात
राहू नकोस . " मोडेल पण वाकणार नाही , मारेल किंवा मारेल पण हटणार नाही "
हा मरगठ्ठा बाणा माझ्या रक्तात आहे ; तुझ्या पोकळ धमक्यांना मी आजीबात भीक
घालणार नाही .
तू कोण आहेस हे मी आणि मीच सर्वाना सांगू शकतो ; मी तुला केव्हाच ओळखले आहे .
पण तू ते स्वतःच जाहीर करावेस ही माझी तुला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे .
आणि एकदा ब्लोग किंवा फेसबुक सारख्या सार्वजनिक विश्वात उडी घेतल्या नंतर 
पुन्हा माझ्याशी खाजगीत  संपर्क करून माझी गुपिते उघड करण्याची धमकी देवून
माझे लेखन अनुकूल गटात करून घेण्याचा प्रयत्न करणे याला ब्ल्याक्मेलिंग म्हणतात .
स्वतःला भारतीय समाजाची सखोल आणि संदर्भीय अभ्यासक म्हणवणाऱ्या भल्या
माणसा स्वतःचे विचार मांडताना तुला स्वतःची ओळख लपविण्याची गरज भासते हाच 
तुझा पराभव आहे ,,,,,,,,हिम्मत असेल तर आधी अंगावर घेतलेली घोंगडी काढ
आणि मग हे विचार मंथनाचे आग्या मोहळ उठव......पण मला माहित आहे
ती हिम्मत तुझ्यात नाही " तू तरवडाला मोहळ शोधून बीड्याच्या धुरात
माशा आंधळ्या करून मोकाल्लेल्या पोळ्या गोळा करणाऱ्या परंपरेतली ( ला )
आहेस ,,,,,,,तुला मी घाबरेण आणि तुझे हे कांद्याने कांदा सडवण्याचे उद्योग
खपवून घेयील असा  चुकून ही समज करून घेऊ नकोस ; 
होऊन जाऊदे पर्दाफाश .....मी तयार आहे ......पण एक लक्षात ठेव एकदा तलवारी 
उपसल्याकी त्यांना खून चढवल्या शिवाय म्यान करता येत नाही .....चालविल्या कि दोन्ही कडचे
रक्त सांडल्या शिवाय गत्यंतर नसते ......होऊन जाऊदे .....निदान या निमित्ताने तू कोण हे तरी जगाला
कळेल .... आणि तुझे हे जे काही वेचारिकतेच्या नावावर थोतांड चालले आहे त्याचाही जाहीर
न्याय निवडा होयील .....काला सच काय आणि सफेद झूट काय हे लोकांना ठरवू दे  तेंव्हा आता खाजगीत बोलूच नकोस ...मराठा किंवा बहुजन म्हणून
माझ्या बद्दल सोम्यताही बाळगू नकोस ...माझ्या कडूनही तशी अपेक्षा करू नकोस.

Friday, 2 December 2011

darudyache pravachan

दारुड्याचे प्रवचन......

अनिता...एखादा दारुडा रोज गल्ली गाजवतो आणि जागवतो सुद्धा
त्याची जी काही बडबड असते त्यातही कधी तत्वज्ञान ,कधी प्रवचन ,
कधी शिवीगाळ असते. त्याचा हा रोजचा गाढव गोंधळ ऐकायला आणि पाहायला
लोक गम्मत म्हणून जमत असतात .त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन नव्हे .
पण त्या दारुड्याला मात्र ते सर्व आपले समर्थक आहेत असे वाटत असते .
काही लोक तर अश्या दारुड्याला मुद्दाम प्रोस्ताहन देवून गम्मत घेत असतात .
त्यात अधिक रंगत यावी म्हणून त्याला दारू सुद्धा पाजतात .
त्याच्या या मूर्ख बेबंद अध:पाताचा खरा त्रास मात्र त्याच्या बायका मुलांना
आई बापाला आणि खऱ्या मित्रांना भोगावा लागतो .
तुला २०,००० हजार वाचक संख्या मिळाली यातले कोण आणि किती
वाचक हॉशे गवसे नवसे प्रकारात मोडतात याची तुला कल्पना आहे काय ?
माश्या काय गुळावर बसतात आणि गुवावरही बसतात , पण तुला मिळणाऱ्या या
पेशींची अनियंत्रित वाढीला कॅन्सर म्हणतात तू त्याला शरीरसोष्ठव मानायला
लागलीस आणि हुरूळून जाऊन आणखी बेबंद पणे लिहु लागलीस तर त्याचा 
त्रास तमाम मराठा आणि बहुजन समाजाला भोगावा लागेल . हा मराठा जिहाद बंद कर
आणि एक मोलाचा सल्ला देतो हे बृहन्नडेचे सोंग सोड , हिम्मत असेल तर तू तुझ्या मुळ
स्वरुपात समोर ये .
   आणखी एक;  माझ्या आजोबांनी  ( मी लहान असताना ) शेतातला भोपळा खाण्यासाठी चोरला
म्हणून एका दलिताला चाबकाने मारले होते ही खरी घटना सांगताना मला लाज वाटण्याचे
काय कारण ? किंवा त्या मुळे माझे आजोबा पापी ठरतात असेही मला वाटत नाही ;
आज भोपळा चोरला म्हणून माफ केले आणि दुसरया दिवशी हिम्मत वाढून त्या दलितांनी  आख्खे
शेत लुटून नेले असते तर माझ्या  आजोबांनी काय करायचे होते ?
आणि त्या त्या काळाची एक रीत परंपरा असते ? हे तू कधी समजून घेणार ?
तुला माहित आहे का ? रायगडाच्या बांधकामाच्या वेळी दिंडी दरवाज्याचे बुरुज बांधताना
त्या बुरुजात ( दोनी कडच्या ) एक जेठा - जेठी ( म्हणजे घरात थोरले असणारे ) मातंग जातीचे
तरुण दाम्पत्य जिवंत पुरण्यात आले होते . त्या काळात असे बळी देण्याची प्रथा ( आता त्याला अघोरी प्रथा म्हणतात ) होती ; आता या घटनेला जबाबदार धरून तू शामची आई आणि माझ्या आजोबा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊ मांसाहेबाना सुद्धा पापी ठरवणार का ? आणि निश्चल पुरीने केलेला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक( ? )  तर सरळ सरळ एका भगताने
अघोरी विद्येच्या आधारे केलेला जादूटोणा होता , त्यात तर कशा कशाचे आणि कश्या पद्धतीने
बळी आणि अघोर कर्म केले गेले ते जाहीर पणे सांगणे ही अनर्थकारी ठरेल
असो अनिता या गोष्टी चा मतितार्थ तुला कळणार नाही ; सांगून काय उपयोग .

Wednesday, 23 November 2011

tu mhantes te thik aahe pan ......

सुनिता तू म्हणतेस ते ठीक
आहे पण ...........................
सुनिता , ठाकरे मंडळी ( बाळा साहेब , उद्धव , राज , लिंबू टिंबू - आदित्य  इत्यादी वेगेरे )  
आणि त्यांच्या राजकीय भूमिका / ध्येय / धोरणे या त्यांच्या पक्षाच्या ( शिवसेना / म न से ) अंतर्गत मामला आहे . पण ठीक आहे या निमित्ताने तू थोडीशी ताळ्यावर येऊन
जमिनीवर उभी राहून आणि आजच्या काळाशी संबधित व सुसंगत लिहायला लागलीस .
हे हि नसे थोडके. सुनिता , महाराष्ट्रातल्या मराठा बहुजनच काय कोणत्याच तरुणांनी ठाकरे आणि कंपनीच्या कोणत्याच तंबूत ( कंपूत ) जाऊ नये या मताचा मी आहे . फक्त ठाकरेच
कशाला शरदरावांचा राष्ट्रवादी , सोनिया बाईंचा कोन्ग्रेस , आठवले आणि इतर दलित संघटनाचे छोटे मोठे तुकडे , बसपा / भा जा पा सारखे उपरे .....इतकेच काय अगदी मदाऱ्याचे
अस्वल ( अण्णा हजारे ) या पेकी कुणाच्याही नादाला मराठा व बहुजनांच्या नव तरुण पिढीने लागू नये .
आणि गेरसमज करून घेऊ नकोस ( छावा/ संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्मवाले / मराठा महासंघ यांच्या तर सावलीलाही उभे राहू नये )
मला सांग सुनिता या पेकी कोण धुतला तांदूळ आहे ? शिवसेनेच्या नावाने बोटे मोडून काय उपयोग ? त्यांना एवढे सगळे करून जेमतेम ५ वर्ष सत्ता मिळाली . उरलेली ४८ वर्षे या महाराष्ट्रात
बहुजनांचीच सत्ता होती ना ! तीन वर्ष मनोहर जोशी ( ब्राम्हण )  आणि २ वर्ष ७ महिने अंतुले ( मुस्लीम ) सोडले तर बाकी ४८ वर्ष मंत्रालयातल्या ६ मजल्या वरील मुख्यामंत्र्याच्या खुर्चीत
टेकलेली बुडे बहुधा मराठ्यांची आणि अपवादाने उर्वरित बहुजनांचीच होती आणि आहेत .
मंत्री मंडळातही कायम पाटील -देशमुखांचाच बोलबाला राहिलेला आहे . म्हणजेच ठाकरेंनी कितीही
पटकली आणि भा ज पा ने त्यात कितीही हवा भरली तरी महाराष्ट्रातील मराठा - बहुजन समाज
त्यांना फारशी भिक घालत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. ते इंदूर हून आले कि आणखी कुठून याचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषाकाच्या वेळी त्यांचा मूळ कुळपुरुष " शिसोदिया " होता आणि तो क्षत्रिय राजपूत होता असा वंशावळीचा पुरावा काढला होता . मग
शिवाजी राजांना सुद्धा तू परप्रांतीय म्हणणार का ग सुनिता ?
 बेताल लिहून आमच्या कडून स्त्रीदक्षिण्या ची अपेक्षा करताना हे लक्षात ठेव सुनिता कि तू स्त्री नाहीस ; बृहनडे चे रूप घेतलेला कुणी तरी बाप्याच आहेस हे आम्ही केव्हाच ओळखले आहे .
पण असो हा काही आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा नाही .
महाराष्ट्रातल्या मराठा बहुजन तरुणांनी शिवसेना / म न से / भा ज पा च्या नादी लागू नये हा तुझा मुद्दा १०० टक्के मान्य पण याच बरोबर या तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे व करिअर कडे लक्ष द्यावे
कोणत्याच राजकीय पक्ष संघटनांच्या नादी लागू नये असे सांगितले असतेस तर ते अधिक निरपेक्ष
सत्य वाटले असते . याचा अर्थ असाही नाही कि सगळ्यांनीच तिकडे पाठ फिरवावी . ज्यांचात क्षमता आहे त्यांनी खुशाल राजकारण करावे . पण कायम सतरंज्या उचलाव्या लागत असतील / दगड गोटे हातात दिले जात असतील / आणि त्या बद्दल श्रमपरिहार म्हणून दारू पाजवली जात असेल तर
या स्थितितील तरुणांनी त्वरित त्या पासून दूर व्हावे हे उत्तम .
आणि तू घाबरू नकोस सुनिता ठाकरे इतके हि अक्कल बाज नाहीत कि महाराष्ट्राला बुद्धू बनाऊ शकतील तुझ्या माहिती साठी सांगतो १९९५ ला शिवसेना भा ज पा ची जी सत्ता आली ती आमच्या
मराठा भूषण, क्रिकेट वाचस्पती, कृषीवल हृदय सम्राट , बारामती पुत्र  माननीय नामदार शरदचंद्रजी  गोविंद रावजी पवार यांच्याच महाकृपेने ! आणि आताही हाच मराठा गडी   पुन्हा त्यांच्या गोटात शिरून अंडी घालण्याच्या तयारीत आहे . तेव्हा सावधान धोका पुढूनच आहे असे नाही. तो आतून बाहेरून भोवताली
असा चोहीकडून आहे . मराठा बहुजनाच्या लेकरांना सावध करायची खरेच मनापासून तळमळ असेल तर
कुणा बद्दल वयक्तिक व जाती आधारित आकस न ठेवता त्यांना योग्य काय अयोग्य काय ते सांग .
सुनिता तू एखाद्या गोष्टीचा आभ्यास चांगला करतेस , वाद - प्रतिवाद हि प्रभावीपणे करू शकतेस
या तुझ्या कोशल्याचा विधायक दिशेने विकास व्हावा आणि त्याचा मराठा बहुजनाच्या तरुण पिढीला
फायदा व्हावा हि अपेक्षा . पुन्हा एकदा पुराण इतिहास सोडून वर्तमानात आल्या बद्दल अभिनंदन


Tuesday, 22 November 2011

anarthach lavaycha tar

(अन)र्थच  लावायचा झाला तर 
.
अनिता  तुझ्या नावातच ' अ ' नीता असल्या मुळे तुझ्या कडून कुठल्या नीतिमान , विधायक आणि
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या विचार मंथनाची अपेक्षा करणार ?. खरेतर तुझ्याशी वाद - संवाद
करण्यातही काही अर्थ ( हशील ) नाही . शिंदे पाटील काय किंवा मी काय उगाच तुझ्या कडून
विधायक विचार प्रबोधनाची अपेक्षा करतो आहोत .
अनिता ज्या प्रमाणे भीष्म पितामह दुर्योधनाला तो आचार विचाराने सुधारावा म्हणून सुयोधन अशी हाक मारीत असत त्या प्रमाणे मी सुध्धा तुला आज पासून अनिता एवजी सुनिता म्हणणार आहे. ( पाहू निदान आता तरी महाभारत टाळताय का ) असो तर सुनिता प्राचीन  वेद-वेदांगे - पुराण - मध्ययुगीन इतिहास - संत- पंत साहित्य किंवा अर्वाचीन -आधुनिक साहित्य किवा प्रथा परंपरा हे त्या त्या काळाशी सुसंगत जीवन प्रणाली . समाजजीवन , समाजव्यवस्थे नुसार तयार होत असतात .
त्या सर्वच संदर्भांचा आजच्या काळाशी सापेक्ष संबध जोडून संबधित लोकांना आरोपीच्या पिंजर्यात
उभे करणे हा अन्याय आहे .
सुनिता तुला माहित नसेल पण ऐक ( मी याचे पुरावे देवू शकतो ) छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा मुख्य दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही बुरूजा
मध्ये ऐक तरुण जेठे मातंग ( मांग) दाम्पत्य जिवंत पुरले होते .त्या काळी अशी परंपरा होती .  ( आता हा सल्ला त्यांना ब्राम्हण कारभार्यांनी दिला असा कांगावा करू नकोस, नशीब समाज कि ब्राम्हण इतिहास कारांनी हि घटना पुस्तकात आणली नाही ( बखरीत आहे ) आता या वरून शिवाजी महाराजांना अंधश्रध किंवा दलित विरोधी समजत येयील का ?
आणखी ऐक संधर्भ पहा संत तुकारामांचा ऐक अभंग आहे
" राजियाचा पुत्र अपराधी देखा | तो काय आणिका दंडवेल |
    दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी ||
आता हा असा अभंग तुकोबांनी का लिहिला असावा ?
अनर्थच लावायचा तर पहा 
१ ) अफजल खानच्या आक्रमणाच्या वेळी खंडोजी खोपडा ( गाव वाचवण्या साठी ) खानाला भेटला ( त्या आधी त्याने महाराजांशी हि संपर्ग साधला होता परंतु महाराजांनी
त्यावेळी" आपले संतुक आपण पाहणे , आमचे कडे आस्तुकी लाऊ नये " असा उलट सांगावा पाठवला .या स्थितीत 
खोपड्या ने खानची भेट घेवून त्याला स्वतः च्या खर्चाने नजराणा आणि रसद देवून आपला गाव वाचवला होता ( तो खानाला सामील झाला नव्हता ) .प्रताप गडावर खान मारला गेल्या नंतर
खोपडा महाराजांना भेटायला गेला . त्या वेळी अचानक शिवाजी महाराजांनी खोपड्याचे हात पाय तोडून चौरंगा करण्याची शिक्षा दिली . शिस्त आणि फंद फितुरीला जरब व पायबंद बसावा
म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या या शिक्षेचे समर्थन करता येयील ( आपण करू )
२ ) रांझ्याच्या पाटलाला देखील आया बहिणीची बाटवणूक केली म्हणून तोफेच्या तोंडी दिले
      गेले ( हि जरब तर पाहिजेच होती )
३) प्रत्येक समयी पावलेला आणि एकदाच ( आई वरल्या मुळे सुतकात गाव सोडू न   शकल्या  मुळे समयासी न पावलेला)  नेताजी पालकर
४ ) सात साथीदार घेऊन मरणाची राड खेळलेला प्रतापराव गुजर
५ ) प्रताप गडाच्या युद्धात पराक्रम केलेला आणि शाहिस्तेखाना वरील कारवाईत शिवाजी महाराजांकडून ठरवून मारला गेलेला संभाजी कावजी
.....................सुनिता वरील सर्व प्रवाद शिवाजी राजेंचे पुत्र युवराज संभाजी कडून थोड्या फार फरकाने झाले होते ( किंवा तशी आवई उठली होती ) परंतु संभाजी राजांना त्या बद्दल कोणतीही शिक्षा झाली नाही .हाच संदर्भ घेवून तुकारामांनी वरील अभंग लिहिला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?
याच संदर्भात तुकोबांचे तोंड बंद करण्या साठी शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला असे म्हटले तर तो अर्थाचा अनर्थ होणार नाही का ?


mazi bahin ashi asu sakat nahi

माझे  बहिणाबाई
अगं माझे बहिणाबाई तू स्वतःला तमाम मराठा समाजाची बहिणाबाई म्हणवतेस
आणि त्यांना ओवाळणी म्हणून जातीय विद्वेषाच्या सुपाऱ्या देतेस ?
अनिता माझी बहिण तुझ्या सारखी असू शकत नाही .
आणखी पुन्हा पुन्हा नम्रपणे विनंती पूर्वक मी तुला सांगतो कृपया मराठा तरुणाईला
बहकावण्याचा तुझा हा उद्योग बंद कर . दुधाचा म्हणून विषाचा पेला या नव तरुण मराठा
पिढीच्या ओठी लाऊ नकोस .
मी स्वतः मराठा आहे . ( आता कृपया त्या शिंदे सारखी माझी टर उडउ नकोस )
पण त्यात विशेष काय आहे ? एका आंबेडकरांच्या मुळे जसे सर्व दलित भारतरत्न ठरत नाहीत तसेच शिवाजी मुळे आम्ही सर्व मराठे छत्रपती ठरत नाहीत. तसेही शिवाजी महाराजांचे राज्य ठाणे .तळकोकण , पुणे . सिन्नर -जुन्नर , पंन्हाळा- कोल्हापूर अशा बारा मावळा  पर्यंतच होते . उर्वरित महाराष्ट्राला त्यांचा इतिहास आणि कार्य थेट स्वातंत्र्य नंतरच माहिती झाले . आपल्या मराठवाड्यात तर मराठे एकतर निजामाचे सरदार होते किंवा मग
गावात कुन्बिकी करीत होते . निजामाच्या अत्याचाराच्या गावागावातील कथा आजूनही जुने लोक सांगतात त्या ऐकल्यास तर तुझा मराठा असण्याचा आभिमान ( गर्व ) गळून पडेल .
असो सांगण्याचा मुद्दा असा कि हे सर्व उगाळण्यात आता काही अर्थ आहे का ?
भारतातील सर्व आक्रमणाना तू ब्राम्हणांना जबाबदार धरणार का ?
मुसलमान , पोर्तुगीज , इंग्रज हे सर्व ब्राम्हण मुळे इथे आले ? आणि त्यांच्या मुळे आम्ही ९०० वर्ष गुलामीत आमचे अस्तित्व हरवून बसलो ? स्वतः च्या स्वार्था साठी एकमेकाच्या
उरावर बसणारी आमच्या रक्तात भिनलेली भाऊबंदकी, जमिनीच्या तुकड्या साठी ,इनामासाठी ,सरदारकी , जहागिरी साठी हपापलेली आमची बेदील बेबंद मराठ्यांची डोक्यालिटी आजूनही आमच्या गुण सूत्रात अनुवंशिकतेने कायम आहे . तू स्वतःच्या गावात ( घरातही ) हे पहिले असशील . आम्ही मराठे १० / १० फुटाचे बांध पडीक पाडू पण भावाचे पट भर वावर हडपण्यात आम्हाला जीवन धन्य झाल्या सारखे वाटते . गावातल्या मारवाड्याला , तालुक्याच्या आमदाराला झेडपी मेंबर ला त्याच्या पोर पोरीच्या लग्नात  आम्ही मोठ मोठ्या भेटी देतो पण गरीब भावाच्या लेकीच्या लग्नात मदती एवजी विघ्न आणण्याचा बेरकी पणा दाखवतो
गढीची जागा मारवाड्याला विकून गढीच्या माती साठी एकमेकाचे मुडदे पाडणारे पाडणारे
मराठे तुला पाहायचेत ? मी दाखवतो . कधी येतेस माझ्या बरोबर बोल ? शेतं पडीक पडून
बायको ( पाटलीन बाई ) गावात रोजंदारीने जाते . पोरगा गावात टुकार सारखा कपाळाला टिळे लाऊन फिरतो . आणि पाटील कडक टोपी घालून बगलेत पुण्य नगरी ची पीळकांडी
ठेऊन तालुक्याला ( बिनकामाचा ) भटकतो ( संध्या काळी कुणाकडून तरी देशी मिळवण्या साठी ) हे चित्र पाहायला येतेस माझ्या बरोबर ? हे मराठे सुधार अनिता ...हे मराठे सुधार ....ब्राम्हणांना दोष देऊन काहीही बदलणार नाही
आमचा र्हास नेमका कुणा मुळे झाला ? अनिता साप निघून गेला आहे तू साप म्हणून
भुई धोपटत आहेस . त्याचा काही उपयोग नाही .


va rekha tai

व्वा रेखा ताई !
तुझे नाव छम्मक छल्लो आहे ते कदाचित ब्लोग साठी घेतलेले टोपण नाव असेल
मी पण ब्लोग वर दादा हरी या टोपण नावाने लिहितो .
खरे सांगुका रेखा , तू जी काही प्रतिक्रिया लिहिली आहेस ती अफलातून आहे .
तुझ्या उपहास शेलीला मनापासून दाद आणि सलाम .
काय सांगू या आनिताने गेले काही महिने ब्लोग आणि फेसबुक वरून जो मराठा जिहाद
चा उछाद मांडला आहे त्यामुळे फेसबुक आणि ब्लोग वर भेट देणाऱ्या मराठा आणि ब्राम्हण मुलां मध्ये कमालीचा विद्वेष निर्माण होऊ लागला होता . माझ्या काही विद्यार्थ्यांनी ( विद्यार्थिनी सुध्धा ) मला हा मराठा दहशतवाद लक्षात आणून दिला . अनिता नावाची कुणीतरी जातीय अहंगंडाने पछाडलेली एक बाई ( ?) विचारवंतांचा / आभ्यासुपनाचा/ चिंतन
आणि प्रबोधनाचा आभास निर्माण करून इतिहास आणि पुराणाचे सोयीचे संदर्भ आणि अर्थ -अन्वयार्थ काढून नव्या पिढीची दिशाभूल करीत आहे . पण कुणीच या बद्दल तिला काही बोलण्याची हिम्मत करीत नव्हते . ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना या अनिताने जाहीर अपमानित केले . असे असताना मी तिच्या या लिखाण बद्दल लिहिले .
तुला त्यातील मर्म उमजले आणि तू अतिशय मार्मिक पणे त्यावर टिप्पणी केली
त्या बद्दल धन्य वाद

Tuesday, 15 November 2011

anita ( ? ) patil yansi

प्रिय  अनिता

मला तुझ्या लेखन आणि प्रबोधना बद्दल आजीबात आक्षेप नाही
मला तू ओळखतेस / ओळखतोस ही आणखी चांगली गोष्ट झाली.
तू तुझी ओळख लपवून का लिहितेस / लिहितोस ?
ज्यांना खरोखर समाज प्रबोधन करायचे असते त्यांनी समाजाचा रोष सहन करण्याची देखील मानसिक /शारीरिक तयारी ठेवावी लागते . तुकारामाला आदर्श मानताना फक्त त्यांचा परखडपणाच नाही तर खुले पणाही आपण आदर्श म्हणून स्वीकारला पाहिजे. तुकारामांनी
अनंत संकटे ( अगदी मृत्यू देखील ) स्वीकारून आपले समाज प्रबोधनाचे कार्य केले . पण कधीही ओळख लपविली नाही .
आपण लिहित चांगले आहात . त्यात आभ्यास आणि चिंतन ही आहे . पण आपण जे लिहितोय ते या सायबर युगात समाजाला पुढे नेणारे / काही दिशा देणारे आहे की
जुन्या जखमांना चिघळून दुहीची बीजे पेरणारे आहे ? हे तुम्हीच पहा .
इतिहासाचा आभिमान जरूर असावा . त्यातून प्रेरणा ही घ्यावी . पण समाजात तेढ निर्माण होईल असे संदर्भ उकरून काढणे हे विचारवंतांचे / समाज प्रबोधकांचे काम नव्हे .
हं......जर आपण छावा / संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्म या सारख्या संघटनाशी
संबधित असाल तर आपले हे वेचारिक अभियान आपणास लखलाभ . मग आपणास काही  सांगण्यास काही अर्थ नाही .
                                                                                 धन्यवाद ! 

                                                                          आपला
                                                                          रवींद्र तहकिक

Tuesday, 8 November 2011

tukoba aani shivba

तुकोबा आणि शिवबा


मला संत तुकाराम महाराजां बद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल नितांत आदर आहे. आपले भाग्य म्हणून तुकाबांच्या रुपात एक देवमाणूस आणि शिवबांच्या रुपात देवदुर्लभ महापुरुष महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुळेच महाराष्ट्राच्या मातीत सुजन्य आणि वीरता रुजली. ( त्यांनी रुजवलेल्या या बीजामुळेच तेंव्हा आणि आजही आपण बामणी कावा/ काही मराठ्यांची फंद- फितुरी आणि मोगली-इग्रजी - काँग्रेसी - शिवशाही ( बाळशाही ) , शारद्शाही इत्यादी आक्रमणातही टिकून आहोत )

पण मला इथे एका वेगळ्याच मुद्दया कडे आपले लक्ष वेधायचे आहे
तुकोबा आणि शिवबा एकाच कालखंडातील आहेत हे आपणास माहितीच आहे .
काहींच्या मते शिवबा तुकोबांना भेटले देखील होते . शिवबांनी तुकोबांना नजराणा पाठवला होता अशीही एक दंत कथा इतिहास म्हणून सांगितली जाते .
असे जर असेल तर मग
१) ज्यावेळी देहूतील ब्राम्हणांनी तुकोबांना त्यांची गाथा डोहात बुडवायला सांगितली
   त्यावेळी त्या परिसराचे सरदार ( जवळपास राजेच ) असणाऱ्या शिवबांनी ही घटना का   
होऊ दिली ( गाथा बुडवण्याची घटना अचानक नाही तर धर्म  पीठ बोलावून, तुक्या वेदिक धर्म विरोधी विचार मांडीत असल्याचे आरोप ठेवून , तुकारामांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याचे नाटक वठवून  समारंभ पूर्वक करण्यात आली होती . गाथेचे बाड खुद्द तुकाराम महाराजांच्या डोक्यावर देवून मागे त्यांचे सर्व टाळकरी / वारकरी चालवत नेवून संत विचाराची धिंड आणि नंतर खून ( पाण्यात बुडवून ) करण्यात आला . ही सर्व प्रक्रिया चार दिवस चालली . तरीही तेथून चार कोसावर असणाऱ्या शिवबांनी हे का रोखले नाही ?

bare mag ?

अनिता बाई समजा तुमच्या तर्क आणि आभ्यास नुसार ब्राम्हण गोमांस भक्षण करीत होते
तर आज ४/५ हजार वर्ष नंतर ते सिद्ध  करून तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?
शेतीचा शोध लागण्या पूर्वी फळे कंदमुळे आणि शिकार करून त्या प्राणी किवा पक्षांचे मांस खाणे या शिवाय दुसरा पर्याय काय होता ? त्यातली त्यात गाय सोपी ( स्वभावाने गरीब, सहज उपलब्ध , आणि भरपूर मांस असणारी ) म्हणून तिचे मांस जास्त प्रमाणात खाल्ले जात असेल. ब्राम्हणांना सहसा भाकड गायी ( अव्त्सासंभावा ) दान म्हणून दिल्या जात असत . या गायींना ब्राम्हणांनी ( शेती नसलेल्या ) पाळायला हवे होते असे आपणास म्हणायचे आहे का ? ( आणि त्यांना खायला काय धोतरे फेडून द्यायची होती ?)